संजय दत्त बयोपिक ठरणार टर्निंग पॉईंट-विकी कौशल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2017 09:14 AM2017-03-10T09:14:37+5:302017-03-10T19:17:41+5:30

संजय दत्त बायोपिकच्या सध्या खूप चर्चा रंगल्या आहेत. सध्या सिनेमाचे शूटिंग सुरू असून यांत संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर ...

Turning point-wiki skills will be considered by Sanjay Dutt Bayopik | संजय दत्त बयोपिक ठरणार टर्निंग पॉईंट-विकी कौशल

संजय दत्त बयोपिक ठरणार टर्निंग पॉईंट-विकी कौशल

googlenewsNext

संजय दत्त बायोपिकच्या सध्या खूप चर्चा रंगल्या आहेत. सध्या सिनेमाचे शूटिंग सुरू असून यांत संजय दत्तची भूमिका रणबीर कपूर साकारतोय.त्यामुळे सिनेमाविषयी प्रत्येक गोष्टी सध्या मीडियासह शेअर केल्या जात आहेत. मसान, रमन राघव यासारखे सिनेमात झळकल्यानंतर विकी कौशल आता संजय दत्त बयोपिकमध्येही झळकणार आहे. या बोयपिकमध्ये तो संजय दत्तच्या मित्राची भूमिका साकारणार आहे.याचनिमित्ताने विकी कौशलशी साधलेला हा संवाद

संजय दत्त बायोपिकमध्ये तू संजय दत्तच्या मित्राची भूमिका साकारणार आहे?या भूमिकेसाठी कशी तयारी तू केली आहेस?

होय,या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच रसिकांमध्ये आतापासूनच कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. रसिकांसह सिनेमात काम करणारे सगळेच कलाकार मंडळी खूप उत्सुक आहेत. त्यात मला संजय दत्तच्या मित्राची भूमिका साकारतोय,इतकेच मी सध्या सांगु शकेन.हा सिनेमा माझ्यासाठी एक टर्निंग पॉइंट ठरणार असल्याचा मला विश्वास आहे. या भूमिकेसाठी सध्या मी माझ्यापरीने तयारी करतोय,सध्या मुंबईत सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. शूटिंग एन्जॉय करतोय.

संजय दत्तचा तू मोठा चाहता आहेस ?त्याच्याविषयी आवडणा-या गोष्टी कोणत्या?

संजय दत्तचा 'वास्तव' सिनेमा मी पाहिला तेव्हापासूनच  तो माझ्या फेव्हरेट अभिनेता बनला आहे.त्याची बोलण्याची स्टाइल,त्याची चालण्याची स्टाइल या गोष्टी मला खूप आवडतात.जेव्हा मला राजकुमार हिरानींनी या सिनेमाविषयी विचारले तेव्हा मी क्षणाचाही विचार न करता सिनेमाला होकार दिला.या सिनेमासाठी माझ्याकडून परफेक्ट गोष्टी कशा होतील याकडेच मी फोकस करतोय.हा एक मोठा प्रोजेक्ट असून संजय दत्तच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या गोष्टी सिनेमात दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.

तू  सिनेमा स्विकारण्याआधी कोणत्या गोष्टींचा विचार करतोस?

मुळात प्रत्येक कलाकार हा त्याला सिनेमात मिळणारी भूमिका ही कशी असणार आणि सिनेमाची कथेनुसार सिनेमात काम करायचे की नाही यानुसार विचार करतो.माझंही तेच आहे.सिनेमाची कथा पहिल्यांदा कलाकाराच्या  मनाला भिडणारी असेन तरच तो रसिकांना काही तरी चांगले देण्याचा प्रयत्न करेन,यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे माझ्या मनाला भिडणारी सिनेमाची कथा असेन तोच सिनेमा मी स्विकारतो.मुळात मसान आणि रमन राघव हे सिनेमा जेव्हा मला ऑफर करण्यात आले तेव्हाही मी सिनेमाची कथा आणि कॅरेक्टरनुसार विचार केला. विशेष म्हणजे दोन्ही सिनेमातील माझ्या भूमिकेचे रसिकांकडून कौतुकही झाले.त्यामुळे माझ्या आयुष्यात हे दोन्ही सिनेमे नेहमीच माझ्या हृदयात घर करून राहतील.


तू उत्तम मराठी बोलतोस,मराठी सिनेमा साकारण्याची इच्छा आहे का?
माझे मित्र मंडळींमुळेच खरंतर मला मराठी भाषा कळते.मात्र बोलताना अडखळत मराठी बोलतो.तेव्हा मित्रमंडळी सांगतात या शब्दाचा उच्चार असा नाही असा कर.सो थोडफार शिकलोय मराठी.मराठी सिनेमाही मला पाहायला आवडतात. मी सैराट आणि किल्ला हे दोन मराठी सिनेमा पाहिले आहेत. हे दोन्ही सिनेमांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.मराठी सिनेमाची ऑफर मिळाल्यास नक्कीच मराठी सिनेमातही काम करायला आवडेल.

Web Title: Turning point-wiki skills will be considered by Sanjay Dutt Bayopik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.