तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यने आत्या एकता कपूरला ठेवले ‘हे’ नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 03:09 PM2017-06-29T15:09:31+5:302017-06-29T20:52:26+5:30

गेल्यावर्षी सरोगसी पद्धतीने एका मुलाचा बाप झालेल्या अभिनेता तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य सध्या त्याच्या फॅमिलीचा जीव की प्राण आहे. ...

Tushar Kapoor's son targets Akita Kapoor and he's the name! | तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यने आत्या एकता कपूरला ठेवले ‘हे’ नाव!

तुषार कपूरचा मुलगा लक्ष्यने आत्या एकता कपूरला ठेवले ‘हे’ नाव!

googlenewsNext
ल्यावर्षी सरोगसी पद्धतीने एका मुलाचा बाप झालेल्या अभिनेता तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य सध्या त्याच्या फॅमिलीचा जीव की प्राण आहे. पप्पा तुषारसह, आजोबा जितेंद्र आणि आत्या एकता कपूर त्याच्यापासून एक क्षणही दूर जाण्याचा विचार करीत नाही. प्रत्येकालाच त्याच्याविषयी लळा लागला आहे. लक्ष्यचे बोबड्या बोलण्यावर सगळेच फिदा असून, तो प्रत्येकालाच एका विशिष्ट नावाने बोलावतो. त्याने आत्या एकता कपूरलाही असेच काहीसे नाव ठेवले असून, तिला ते खूपच आवडते. एकताला लक्ष्य ‘बू’ या नावाने बोलावतो. त्यामुळे ती सध्या कपूर परिवारात ‘बू’ नावाने फेमस होत आहे. 

नुकताच तुषार कपूरच्या या चिमुकल्या शहजाद्याचा मोठ्या धूम धडाक्यात ‘बर्थ डे’ सेलिब्रेट करण्यात आला. ज्यामध्ये एकता होस्टच्या भूमिकेत होती. कारण पप्पा तुषारपेक्षा लक्ष्य आत्या एकताची कंपनी खूप एन्जॉय करतो. कारण असा एकही दिवस नाही की, लक्ष्य आत्या एकताला भेटत नसेल. एकतादेखील लक्ष्यसोबतच्या प्रत्येक क्षणाची माहिती सोशल मीडियावर न विसरता शेअर करीत असते. एकताने नुकतेच तिच्या कंपनीमार्फत निर्माण केलेल्या एक सिरीयलचे लॉन्चिंग केले. यावेळी मुलाखत देताना एकताने यासर्व बाबीचा उलगडा केला. एकताने म्हटले की, लक्ष्यने मला नवे नाव दिले आहे. तो मला ‘बू’ असे म्हणतो. जेव्हा तो मला या नावाने बोलावतो तेव्हा मला त्याचा निरागस चेहरा बघून त्याच्यावर खूपच प्रेम येते. ही बाब जरी आठवली तरी, त्याला भेटावसे वाटते. 

यावेळी एकताने हेदेखील स्पष्ट केले की, गेले वर्ष तिच्यासाठी फारसे चांगले नव्हते. माझ्या सिरीयल हिट ठरल्या, परंतु चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल केली नव्हती. ज्यामुळे मी खूपच त्रस्त होती. परंतु लक्ष्यमुळे माझ्या  आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण परतले. जेव्हा मी लक्ष्यला बघत होती, तेव्हा माझे सर्व टेंशन मी विसरून जात असे. एवढेच काय तर लक्ष्यचे नाव ऐकूनदेखील माझ्या चेहºयावर हास्य उमलायचे. थोडक्यात काय तर एकताला लक्ष्यचा जसा जिव्हाळा लागला आहे, अगदी तसाच जिव्हाळा आजोबा जितेंद्र यांनादेखील लागलेला आहे. तेदेखील लक्ष्यशिवाय एक क्षण राहू शकत नाहीत. 

यावेळी एकताला जेव्हा लग्न कधी करणार? असे विचारण्यात आले तेव्हा तिने नेहमीच्याच पठडीतील उत्तर दिले. ती म्हणाली की, लग्न या शब्दावर माझा फारसा विश्वास नाही. परंतु विश्वास आणि लग्न यामध्ये बरेचसा फरक आहे. पण काहीही असो, जितेंद्र यांच्या परिवारात सध्या आनंदाचे वातावरण असून, सगळेच लोक लक्ष्यची कंपनी एन्जॉय करीत आहेत. 

Web Title: Tushar Kapoor's son targets Akita Kapoor and he's the name!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.