अडचणीत आहे टीव्हीचा ‘राम’ गुरमीत चौधरी, वाचा काय आहे प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 03:28 PM2018-06-04T15:28:40+5:302018-06-04T20:58:40+5:30

टीव्हीचा ‘राम’ अर्थात अभिनेता गुरमीत चौधरी अडचणीत आलायं. होय, राजस्थानातील एका व्यक्तिने कथितरित्या गुरमीतवर फसवणुकीचा आरोप केला आहे. या ...

TV's 'Ram' Gurmeet Chowdhury, what is the matter of the story !! | अडचणीत आहे टीव्हीचा ‘राम’ गुरमीत चौधरी, वाचा काय आहे प्रकरण!!

अडचणीत आहे टीव्हीचा ‘राम’ गुरमीत चौधरी, वाचा काय आहे प्रकरण!!

googlenewsNext
व्हीचा ‘राम’ अर्थात अभिनेता गुरमीत चौधरी अडचणीत आलायं. होय, राजस्थानातील एका व्यक्तिने कथितरित्या गुरमीतवर फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणी राजस्थानच्या नोखा येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रारकर्त्याने केलेल्या दाव्यानुसार, फेसबुकवर त्याची गुरमीत देबलीनासोबत ओळख झाली होती. यादरम्यान गुरमीत नावाच्या संबंधित व्यक्तिने तक्रारकर्त्याला हिरो बनवण्याचे आमिष दाखवले आणि यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने केलेल्या दाव्यानुसार, त्याने गुरमीत नावाच्या या व्यक्तिच्या खात्यात ११ लाख रूपये जमा केलेत. पण इतकी मोठी रक्कम बंद केल्यानंतर संबंधित फेसबुक अकाऊंट, बँक अकाऊंट सगळे काही बंद झाले. सध्या राजस्थान पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.  
या संपूर्ण प्रकरणानंतर अडचणीत सापडलेल्या अभिनेता गुरमीत चौधरीने आपल्या बचावार्थ दोन ट्वीट केले आहेत. ‘माझ्याविरोधात जो काही धोकादायक खेळ सुरू आहे, त्याचा थांगपत्ता लावण्यासाठी मी मुंबई पोलिसांकडे मार्चमध्ये तक्रार दाखल केली होती. मर्डर, सुसाईड आणि मनी लाँडिंगच्या धमक्यांदरम्यान काही नंबर्स आणि नाम ट्रॅक केल्यानंतर सगळे काही समोर येईल,’असे गुरमीतने म्हटले आहे. दुस-या ट्वीटमध्ये त्याने देशाच्या कायदा व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे.



ALSO READ : आत्महत्या करेल नाहीतर तुला ठार मारेल...! गुरमीत चौधरीला चाहत्याची धमकी!!

‘मी देशाच्या कायदा व्यवस्थेवर विश्वास असणारी व्यक्ती आहे. आम्हा कलाकारांचे आयुष्य सार्वजनिक असते म्हणून आमच्यासोबत मार्फिंग, लॉन्ड्रिंग, स्कॅम असे काहीही सोपे नाही. मीडिया, कुठलीही रँडम स्टोरी उचलण्याआधी तुम्ही प्रतीक्षा करावी,’ असे त्याने म्हटले आहे.
गुरमीतची पत्नी देबलीना हिनेही एक ट्विट केले आह. आम्ही प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी ट्वीट्स, मेल, नाव, नंबर्स, रिसीप्ट आणि व्हिडिओ सगळे काही उपलब्ध करून दिले आहे. पण सगळेच व्यर्थ़ मुंबई पोलिसांकडून कुठलीही मदत नाही, असे तिने लिहिले आहे.

Web Title: TV's 'Ram' Gurmeet Chowdhury, what is the matter of the story !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.