अक्षय कुमारला लग्नासाठी होकार देण्यापूर्वी ट्विंकल खन्नाने तयार केले होते असे दोन चार्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 01:36 PM2019-02-01T13:36:46+5:302019-02-01T13:39:21+5:30
होय, अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी ट्विंकलने बराच रिसर्च केला होता. ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे
सन २०११ मध्ये अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांचे लग्न झाले. या लग्नाच्या उण्यापु-या १८ वर्षांनंतर एक मोठ्ठा खुलासा झाला आहे. होय, अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी ट्विंकलने बराच रिसर्च केला होता. ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. खुद्द ट्विंकलने ‘कॉफी विद करण’ या करण जोहरच्या चॅट शोमध्ये याबाबतचा खुलासा केला होता.
अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी ट्विंकलने दोन चार्ट तयार केले होते. यातील एक चार्ट अक्कीच्या हेल्दी जीन्सशी संबंधित होता आणि दुसरा लग्नापासून होणा-या नफ्या-तोट्याबद्दल. हे चार्ट तयार करण्यामागे ट्विंकलचे खास लॉजिक होते.
मुलांच्या जन्मावेळी कुठलीही अनुवांशिक समस्या उद्भवू नये, असे तिचे मत होते. त्यामुळे अक्षयच्या कुटुंबात कुणाला अनुवांशिक आजार होता का, आहे का याची अतिशय खोलवर माहिती तिने घेतली होती. अक्षयच्या कुटुंबातील पुरूषांचे कोणत्या वयात केस गळले, त्याची आंटी कंचनचा मृत्यू कसा झाला, असे अनेक प्रश्न लग्नापूर्वी तिने अक्षयला विचारले. ट्विंकलचे हे प्रश्न ऐकून एक क्षण अक्षयही चिंतीत झाला होता. आपल्या कुटुंबाबद्दल ही इतकी खोदून खोदून माहिती का घेतेय, हेच त्याला कळत नव्हते. पण प्रत्यक्षात ट्विंकलअक्षयची जनेटिक हिस्ट्री चेक करत होती.
दुस-या चार्टमध्ये या लग्नाचे फायदे आणि तोटे ट्विंकलने लिहिले होते. ट्विंकलने केलेल्या चार्टनुसार, या लग्नाचे दोन तोटे होते आणि आठ फायदे होते. हे फायदे-तोटे आजही जसेच्या तसे आहे, असेट्विंकलने सांगितले होते.
एकंदर काय तर अक्षयसोबत लग्न करण्याचा निर्णय ट्विंकलने अतिशय विचारपूर्वक घेतला होता. आज १८ वर्षानंतरही दोघही सुखाने नांदत आहेत, त्याचे कारण कदाचित हेच असावे.