​ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना कोणाले म्हणायचे छोटे पापा?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2017 06:56 AM2017-05-22T06:56:06+5:302017-05-22T16:37:56+5:30

डिम्पल कपाडियाने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सुपरस्टार राजेश खन्नासोबत लग्न केले. बॉबी हा तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच ...

Twinkle Khanna and Rinki Khanna Angle little papa to say? | ​ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना कोणाले म्हणायचे छोटे पापा?

​ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना कोणाले म्हणायचे छोटे पापा?

googlenewsNext
म्पल कपाडियाने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी सुपरस्टार राजेश खन्नासोबत लग्न केले. बॉबी हा तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच तिला दिवस गेलेले होते. राजेश खन्नासोबत लग्न झाल्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. या दरम्यान ट्विंकल आणि रिंकी या दोन मुलींना तिने जन्म दिला. डिम्पल आणि राजेश यांचा संसार सुरुवातीच्या काही काळ सुरळीत सुरू होता. पण लग्नानंतर काहीच वर्षांत डिम्पल आणि राजेश यांच्यात भांडणे व्हायला लागली आणि ते वेगळे झाले.
राजेश खन्ना यांच्यासोबत भांडणे झाल्यानंतर काही वर्षांनी डिम्पल कपाडियाच्या आयुष्यात सनी देओल आला असे म्हटले जाते. सनी देओल आणि अमृता सिंग यांचे बेताब या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी अफेअर सुरू होते. पण काहीच महिन्यांत त्याचे ब्रेकअप झाले. याच काळात डिम्पल सनीचे अफेअर सुरू झाले. नव्वदच्या काळात डिम्पल आणि सनीच्या अफेअरची मीडियात प्रचंड चर्चा होती. त्यावेळी सनीचे पूजासोबत लग्नदेखील झाले होते. 
डिम्पल आणि सनी यांच्यात असलेल्या नात्यामुळे ट्विंकल आणि रिंकी त्यांना छोटे पापा असे म्हणत असत. तसेच त्या दोघांनी लपून लग्न देखील केले होते असे म्हटले जाते. तसेच डिम्पलची बहीण सिम्पलचा मृत्यू झाला त्यावेळी सनी डिम्पलसोबत सतत होता अशी त्यावेळी चांगलीच चर्चा होती. तसेच तिच्या श्रद्धांजली सभेलादेखील सगळ्या कुटुंबीयांसोबत राजेश खन्ना नव्हे तर सनी उभा राहिला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सनी आणि डिम्पलची प्रेमकथेची चांगलीच चर्चा होत आहे. पण या सगळ्याव मौन राखणेच या दोघांनीही पसंत केले आहे. 

 

Web Title: Twinkle Khanna and Rinki Khanna Angle little papa to say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.