प्रियांका चोप्राला मारण्यासाठी सेटवर गेली होती ट्विंकल खन्ना आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 10:31 AM2022-12-29T10:31:15+5:302022-12-29T10:33:15+5:30

Twinkle Khanna Birthday: ट्विंकलने एकदा असा काही कारनामा केला होता की, मीडियात त्याची खूप चर्चा झाली होती. हा किस्सा अक्षय कुमार आणि  प्रियांका चोप्राशी संबंधित होता.  

Twinkle Khanna had issues with Akshay Kumar co star Priyanka Chopra went to slap her on movie sets | प्रियांका चोप्राला मारण्यासाठी सेटवर गेली होती ट्विंकल खन्ना आणि मग...

प्रियांका चोप्राला मारण्यासाठी सेटवर गेली होती ट्विंकल खन्ना आणि मग...

googlenewsNext

Twinkle Khanna Birthday: अभिनेता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाचा आज वाढदिवस आहे. 1974 मध्ये तिने तेव्हाचे सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांच्या घरात जन्म घेतला होता. ट्विंकलच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला तिचा एक किस्सा सांगणार आहोत. ट्विंकल ही तशी टॉमबॉयसारखी बिनधास्त बोल्ड आहे. तिने एकदा असा काही कारनामा केला होता की, मीडियात त्याची खूप चर्चा झाली होती. हा किस्सा अक्षय कुमार आणि  प्रियांका चोप्राशी संबंधित होता.  

अक्षय आणि प्रियांकाची जोडी एकेकाळी सुपरहिट जोडी होती. दोघांनी सोबत अंदाज, ऐतराज आणि वक्त सिनेमात काम केलं. मीडिया रिपोर्टनुसार, 2003 मध्ये आलेल्या अंदाज सिनेमाच्या शूटिंग दरम्यान प्रियांका आणि अक्षय कुमारची जवळीक वाढली होती. 

पूर्ण इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या जवळ येण्याची चर्चा रंगली होती. असं सांगण्यात येतं की, ही बातमी ट्विंकलपर्यंतही पोहोचली होती. त्यानंतर ती फार इनसिक्योर झाली होती. अशाही बातम्या आल्या होत्या की, एक दिवस ट्विंकल खन्नाने प्रियांचा चोप्राला फोन करून अक्षयपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. पण तरीही ट्विंकलच्या बोलण्याचा काही असर दिसला नव्हता. त्यानंतर रागाच्या भरात ट्विंकलने जे केलं होतं त्याची खूप चर्चा झली होती.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय आणि प्रियांकाची जवळीकीला वैतागून ट्विंकल वक्त सिनेमाच्या सेटवर पोहोचली होती. असं सांगितलं जातं की, ती खूप रागात होती आणि ती प्रियांकाला शोधत होती. पण त्या दिवशी प्रियांका सेटवर नव्हती. अशात  अक्षय कुमारने पत्नी ट्विंकलला कसंतरी शांत केलं आणि घरी पाठवलं. असं म्हणतात की, यानंतर अक्षय कुमार प्रियांकापासून दूर गेला आणि 2005 मध्ये रिलीज झालेल्या वक्त सिनेमानंतर त्याने प्रियांकासोबत पुन्हा सिनेमाही केला नाही.

Web Title: Twinkle Khanna had issues with Akshay Kumar co star Priyanka Chopra went to slap her on movie sets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.