ट्विंकल खन्नाची ‘ती’ पोस्ट वाचून राखी सावंतला आभाळ ठेंगणं झालं...! तुम्हीही वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:39 AM2021-09-01T10:39:55+5:302021-09-01T10:41:30+5:30
राखी सावंतला सगळेच ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखतात. पण राखीच्या प्रेमात असणारेही काही लोक आहे. होय, विश्वास बसत नसेल तर ट्विंकल खन्नाची ही पोस्ट तुम्हाला वाचायलाच हवी.
राखी सावंतला (Rakhi Sawant) सगळेच ड्रामा क्वीन म्हणून ओळखतात. पण राखीच्या प्रेमात असणारेही काही लोक आहे. होय, विश्वास बसत नसेल तर अक्षय कुमारची बायको ट्विंकल खन्नाची (Twinkle Khanna) ही पोस्ट तुम्हाला वाचायलाच हवी. ट्विंकलने राखीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सध्या या पोस्टची चांगलीच चर्चा आहे. राखीला तर जणू आभाळ ठेंगणं झालंय. ट्विंकलने खास आपल्यासाठी पोस्ट लिहावी,हे पाहून तिचा आनंद गगणात मावेनासा झालाय.
ट्विंकलने ‘Tweak India’ या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर राखीसाठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने राखीचं मनापासून कौतुक केलं आहे.
ट्विंकलने Tweak Indiaच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राखीने फिकट भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत ट्विंकलने राखीचं कौतुक केलं.
‘ राखी सावंत सर्वकाही आहे आणि जिच्या सारखी मी होऊ शकत नाही. म्हणूनच मला ती खूप आवडते,’ असे या फोटोसोबत ट्विंकलने लिहिलं आहे. इतकंच नाही तर कॅप्शनमध्ये राखीची प्रशंसा केली आहे. तिने लिहिलं,‘गेल्या अनेक वर्षांपासून राखी सावंतची अनेकांकडून खिल्ली उडवली जातेय. पण राखीने त्या सर्व गोष्टींचा स्वत:वर परिणाम होऊ दिला नाही. मी जर तिच्या जागी असते तर कदाचित हे सर्व सहन करु शकले नसते. मी स्वत:ला मीयरकॅटसारखं एखाद्या खड्ड्यात लपवून घेतलं असतं आणि कदाचित उर्वरित आयुष्य असंच घालवलं असतं. पण कोणी कितीही खिल्ली उडवली तरी राखीच्या मनात लाजीरवाणी भावना निर्माण झाली नाही. आपण तिच्यावर जितकं हसू तितकीच ती सुद्धा हसते. राखीनं तिच्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढलं आणि या गळेकापू इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी जागा निर्माण केली.’
राखीनं मानले आभार
ट्विंकलच्या पोस्टचा फोटो पोस्ट करत राखीने तिचे आभार मानलेत. ‘तुझ्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून माझ्यासाठी पोस्ट लिहिल्याबद्दल तुझे आभार. आज मी जे काही कमावले आहे त्याचा मला अभिमान आहे. मी माझा आणि माझ्या कुटुंबीयांचा सांभाळ करु शकते. लोकांना हसवून, त्यांचे मनोरंजन करुन अनेक अडचणींवर मात केली आहे,’ असं राखीनं लिहिलं. शिवाय ट्विंकलच्या ‘मेला’ या चित्रपटातील बाबू जरा बचके रे या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओही तिने शेअर केला.