ट्विंकल खन्नाने म्हटले, ‘जर मासिक पाळी आली नसती तर जगात कोणीच जन्माला आले नसते’!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 12:09 PM2018-02-09T12:09:06+5:302018-02-09T17:46:21+5:30

दिग्दर्शक आर. बाल्की यांचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. चित्रपटाची निर्माती ट्विंकल खन्नाने नुकतेच या चित्रपटाच्या अनुषंगाने एका ...

Twinkle Khanna said, 'If there was no menstrual cycle then no one in the world would have been born'. | ट्विंकल खन्नाने म्हटले, ‘जर मासिक पाळी आली नसती तर जगात कोणीच जन्माला आले नसते’!

ट्विंकल खन्नाने म्हटले, ‘जर मासिक पाळी आली नसती तर जगात कोणीच जन्माला आले नसते’!

googlenewsNext
ग्दर्शक आर. बाल्की यांचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. चित्रपटाची निर्माती ट्विंकल खन्नाने नुकतेच या चित्रपटाच्या अनुषंगाने एका मुलाखतीत आपले मत व्यक्त केले. तिने म्हटले की, मासिक पाळी ही एक सामान्य प्रक्रिया आहे. त्यामुळे यावर बोलताना संकुचितपणा वाटू देऊनये. जर महिलांना मासिक पाळीच आली नसती तर जगात कोणीही जन्माला येऊ शकले नसते. आपल्या समाजातील प्रत्येकाने मासिक पाळीबद्दल त्यांच्या मनात असलेली चुकीची भावना बदलायला हवी. ‘पॅडमॅन’च्या माध्यमातून लोकांचा हा विचार बदलेल अशी अपेक्षा वाटत असल्याचेही ट्विंकलने सांगितले. 

पुढे बोलताना ट्विंकलने म्हटले की, मी मासिक पाळीविषयी अनेक लेख लिहिले. याचदरम्यान मला मुरुगनाथम यांची स्टोरी समजली. ही स्टोरी ऐकून मी खूपच प्रभावित झाली. कारण त्यांची ही स्टोरी मला प्रोत्साहित करणारी वाटली. ही स्टोरी अशा व्यक्तीची आहे, ज्याने आपल्या पत्नीसाठी एवढे मोठे पाऊल उचलले. पुढे मी मुरुगनाथम यांची कथा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला. हे करण्यामागे एकच उद्देश होता तो म्हणजे याविषयी लोकांच्या विचारात परिवर्तन व्हावे. 

ALSO READ : Padman review : गंभीर विषयावर हलक्या फुलक्या शब्दांत भाष्य करणारा पॅडमॅन

ट्विंकलने हेदेखील सांगितले की, आता टीव्हीवर येणाºया सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातींमध्ये बदल बघावयास मिळेल. या जाहिरातीमध्ये निळ्या रंगाचा पदार्थ दाखविला जातो. परंतु पुढील काळ्यात निळ्याऐवजी लाल रंगाचा पदार्थ दाखविण्यात येईल. त्याचबरोबर मासिक पाळीविषयी मोकळेपणाने सांगितले जाईल. त्याचबरोबर प्रत्येकवेळी दुकानदार महिलांना सॅनिटरी पॅड पेपर किंवा काळ्या रंगाच्या कॅरिबॅगमध्ये देतात. हे पुढच्या काळात बघावयास मिळणार नसल्याचेही ट्विंकलने म्हटले. 

Web Title: Twinkle Khanna said, 'If there was no menstrual cycle then no one in the world would have been born'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.