कधी काळी आई डिंपलची ‘स्पॉटबॉय’ होती ट्विंकल खन्ना, मायलेकींची ही स्टोरी एकदा वाचाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 12:52 PM2021-11-29T12:52:41+5:302021-11-29T12:56:02+5:30
‘ऑन कॅमेरा, ऑफ कॅमेरा’ (On Camera Off Camera) या पुस्तकात ट्विंकल व तिची आई डिंपल कपाडियाबद्दल (Dimple Kapadia) एक खुलासा केला आहे.
अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नानं (Twinkle Khanna)अभिनय कधीच सोडला आहे. आता काय तर ती लेखिका म्हणून ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये फ्लॉप झालेली ट्विंकल याशिवाय आणखी कशासाठी ओळखली जाते तर तिच्या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठी. होय, सोशल मीडियावरच्या तिच्या पोस्ट म्हणूनच क्षणात व्हायरल होतात. तूर्तास ट्विंकलनं तिची आई डिंपल व तिचा एक किस्सा शेअर केला आहे.
भावना सोमय्या यांनी ‘ऑन कॅमेरा, ऑफ कॅमेरा’ (On Camera Off Camera) हे पुस्तक लिहिलं आहे. होय, या पुस्तकात ट्विंकल व तिची आई डिंपल कपाडियाबद्दल (Dimple Kapadia) एक खुलासा केला आहे. डिंपल एकेकाळी मोठी स्टार होती आणि ट्विंकल काय तर तिचं लगेज कॅरी करायचं काम करायची. ऐकून आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे.
ट्विंकलनं दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ‘ऑन कॅमेरा, Aफ कॅमेरा’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे तर दुस-या फोटोत या पुस्तकाच्या एका पानावरचा मजकूर आहे. या पानावर ट्विंकलच्या ‘स्पॉटबॉय’बनण्याची कहाणी आहे.
‘माझ्या भूतकाळाचा स्रॅपशॉट. हे पुस्तक भावना सोमय्यानं लिहिलं आहे. हे पुस्तक माझ्यासाठी काही आठवणी घेऊन आलंय,’ असं पोस्ट शेअर करताना ट्विंकलनं लिहिलं आहे.
ट्विंकल आईसाठी स्पॉट बॉयचं काम करायची...
पुस्तकाची लेखिका लिहिते, ‘1994 मध्ये मला एअरपोर्टवर डिंपल कपाडिया व तिची मुलगी ट्विंकल दोघी भेटल्या. दोघीही फ्लाईटची घोषणा होण्याची प्रतीक्षा करत होते. ट्विंकलजवळ खूप मोठं लगेज होतं. ओझ्याखाली दबरलेल्याट्विंकलला पाहून मी तिच्यासोबत बोलले. तू स्वातंत्र्याचा जास्तीत जास्त आनंद घ्यावास, असं मला वाटतं. कारण तू स्वत: मोठी स्टार होशील तेव्हा अनेक गोष्टी बदलतील, असं मी तिला म्हणाले. यावर ‘भविष्याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. पण सध्या तरी मी माझ्या स्टार आईची स्पॉटबॉय आहे,’असं ट्विंकल म्हणाली होती. इतकं मोठं लगेच कॅरी करण्याचं कारणही ट्विंकलनं सांगितलं होतं. माझ्या आईला बॅग चेकिंग करणं आवडत नाही. म्हणून मी राणी साहेबांसाठी कुली बनले आहे,असं ती म्हणाली होती.