Twinkle Khanna चा मुलगा आरव उडवतो तिची खिल्ली! हा एक किसींग सीन आहे कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 17:20 IST2021-12-23T17:19:24+5:302021-12-23T17:20:10+5:30
सोशल मीडियावर ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) महत्वाच्या मुद्द्यांवर आपली मतं मांडते आणि चर्चेत असते पण तुम्हाला माहीत नसेल की, बिनधास्त ट्विंकलची तिचा मोठा मुलगा खिल्ली उडवतो. याचा खुलासा तिनेच केला होता.

Twinkle Khanna चा मुलगा आरव उडवतो तिची खिल्ली! हा एक किसींग सीन आहे कारण...
आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी आणि पुस्तकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) गेल्या अनेक वर्षांपासून रूपेरी पडद्यापासून दूर आहे. आज ती तिच्या मुलांचं संगोपन करत आहे आणि लेखिका म्हणून नाव कमवत आहे. सोशल मीडियावर ती महत्वाच्या मुद्द्यांवर आपली मतं मांडते आणि चर्चेत असते पण तुम्हाला माहीत नसेल की, बिनधास्त ट्विंकलची तिचा मोठा मुलगा खिल्ली उडवतो. याचा खुलासा तिनेच केला होता.
किसींग सीनवरून घेतात मजा
हे तर सर्वांनाच माहीत आहे की, ट्विंकल तिचा मुलगा आरव आणि मुलगी नितारासोबत एका आईपेक्षा जास्त मैत्रिणीसारखी वागते. काही वर्षाआधी 'मिड डे'ला दिलेल्या एका मुलाखतीत ट्विंकल म्हणाली होती की, 'आरव फारच मस्तीखोर आहे. माझी मुलं माझ्याच सिनेमातील सीन्स काढून माझी खिल्ली उडवतात. ते 'जान' सिनेमातील एक सीन पुन्हा पुन्हा लावतात. ज्यात मी एका पुरूषाच्या छातीच्या आजूबाजूला किस करत असते. माझ्या वाढदिवसाला तर त्याने याचं कोलाजही बनवलं होतं'.
ही मुलाखत साधारण ४ वर्षाआधीही आहे. यात तिने अॅक्टिंग करिअरबाबत सांगितलं होतं. ट्विंकल खन्ना म्हणाली होती की, मुलाने तिचे सिनेमे बघाने असं तिला अजिबात वाटत नाही. याचं कारण हे सिनेमे पाहिल्यावर तो मला चिडवतो.
ट्विंकल खन्नाने पुढे सांगितलं होतं की, तिचा मुलगा आरवची मस्ती फक्त चिडवण्यापर्यंत नाहीये. एकदा त्याने ट्विंकलच्या वाढदिवशी अशा सीन्सचं एक कोलाज तयार करून तिला गिफ्टही केलं होतं. हे गिफ्ट त्याने भर पार्टीत तिला दिलं होतं.