twitter-battle: क्रीडा मंत्र्यांनी केली पेन्टिंगशी तुलना अन् भडकली जायरा वसीम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 06:12 PM2017-01-20T18:12:41+5:302017-01-20T18:12:41+5:30

‘दंगल’ने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री जायरा वसीम गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. आता ती पुन्हा नव्याने चर्चेत आलीय. होय, ...

twitter-battle: Sports Minister compares to painting and Wasim jaara! | twitter-battle: क्रीडा मंत्र्यांनी केली पेन्टिंगशी तुलना अन् भडकली जायरा वसीम!

twitter-battle: क्रीडा मंत्र्यांनी केली पेन्टिंगशी तुलना अन् भडकली जायरा वसीम!

googlenewsNext
ंगल’ने प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री जायरा वसीम गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. आता ती पुन्हा नव्याने चर्चेत आलीय. होय, क्रीडा मंत्री विजय गोयल यांना जायराने अप्रत्यक्षपणे फटकारले आहे.  विजय गोयल यांनी जायराची तुलना एका  पेन्टिंगसोबत केली होती. यात एक महिला बुरखा घालून आहे. जायराला ही तुलना अजिबात रूचली नाही. मला अशा ‘ पेन्टिंग’शी जोडले जायला नको, असे जायराने म्हटले आहे. 


याच पेन्टिंगची तुलना गोयल यांनी जायरा वसीमशी केली होती.

गोयल यांनी एका चित्रप्रदर्शनातील एका पेंटिगचा फोटो पोस्ट केला होता. या पेन्टिंगची तुलना गोयल यांनी जायरा वसीमशी केली होती. ‘ही पेन्टिंग जायरा वसीमसारख्या मुलींची कथा सांगतेय. पिंजरा तोडून आमच्या मुली उंंच भरारी येऊ पाहत आहेत,’ असे गोयल यांनी लिहिले होते. पण जायराला या पेन्टिंगसोबत तिची केली गेलेली तुलना अजिबात आवडली नाही. मग काय, तिने थेट तसे जाहिर केले. ‘विजय सर, संपूर्ण आदरासह मी सांगू इच्छिते की, मी तुमच्याशी सहमत नाही. मी आपल्याला विनंती करते की, आपण मला अशा पेन्टिंगसोबत जोडू नये. हिजाबमधील महिलाही सुंदर आणि स्वतंत्र असतात. या पेन्टिंगमध्ये जी कथा सांगितली गेलीय, त्या कथेचा माझ्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाही.’असे जायराने लिहिले.
जायराच्या या पोस्टनंतर गोयल यांनी लगेच स्वत:चा बचाव केला. तू चुकीचे समजते आहे. मी तुझ्या कार्याची प्रशंसा केलीय. कदाचित तुला माझ्या वाक्याचा अर्थ कळलेला नाही. असो, तुला शुभेच्छा. आपण लवकरच भेटू, अशी आशा, असे त्यांनी लिहिले.

also read - जायरा वसीमच्या समर्थनार्थ आमिर खानचे ट्विट

मुळ जम्मू आणि काश्मिरची असलेली जायराकाही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना भेटली होती. मुफ्ती यांची भेट घेतल्यानंतर फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून माफी मागणारी एक पोस्ट जायराने शेअर केली होती. या भेटीनंतर जायराची सोशल मीडीयावर खिल्ली उडवली जात होती. त्यानंतर जायराने एक खुला माफीनामा सोशल मीडियावर शेअर केला होता. पण, काही वेळाने जायराने तो माफीनामा सोशल मीडियावरुन काढूनही टाकला होता. 
आमिरसोबतच अनुपम खेर आणि जावेद अख्तर या ज्येष्ठ कलाकारांनीही जायराला ट्विटरवरुन पाठिंबा दिला आहे. ‘जायरा तुझा माफीनामा ही एक दु:खदायक बाब आहे. पण, त्यासाठी फार धैर्य लागतं. तुला असे करण्यासाठी ज्या भ्याड लोकांनी प्रवृत्त केले आहे. पण, तरीही तू माझी आदर्श आहेस’, असे ट्विट अनुपम खेर यांनी केले होते.

Web Title: twitter-battle: Sports Minister compares to painting and Wasim jaara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.