रिया चक्रवर्ती अन् इंग्लंडच्या ‘या’ क्रिकेटपटूचे कनेक्शन काय? व्हायरल होतेय 6 वर्षांपूर्वीचे ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 02:05 PM2020-08-24T14:05:29+5:302020-08-24T14:07:48+5:30

रिया चक्रवर्ती आता एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. होय, ते सुद्धा इंग्लंडच्या  गोलंदाजाच्या एका जुन्या ट्वीटमुळे.

Twitterati Can’t Keep Calm After They Found Out Jofra Archer’s Tweet On ‘Rhea’ |  रिया चक्रवर्ती अन् इंग्लंडच्या ‘या’ क्रिकेटपटूचे कनेक्शन काय? व्हायरल होतेय 6 वर्षांपूर्वीचे ट्वीट

 रिया चक्रवर्ती अन् इंग्लंडच्या ‘या’ क्रिकेटपटूचे कनेक्शन काय? व्हायरल होतेय 6 वर्षांपूर्वीचे ट्वीट

googlenewsNext
ठळक मुद्दे सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. लवकरच सीबीआय रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित असलेली रिया चक्रवर्ती आता एका ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. होय, ते सुद्धा इंग्लंडच्या  गोलंदाजाच्या एका जुन्या ट्वीटमुळे. रिया चक्रवर्ती आणि इंग्लंडच्या या गोलंदाजात काय कनेक्शन आहे, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर आता हे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेऊ.
तर इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर याने सुमारे 6 वर्षांपूर्वी एक ट्वीट  केले होते. त्याच्या या ट्वीटमध्ये रिया नावाचा उल्लेख होता. जोफ्राने केलेले हेच ट्वीट  सध्या व्हायरल होतेय. हे ट्वीट  पाहून जोफ्रा आर्चर खरोखरच अंर्तज्ञानी असल्याचे नेटक-यांनी म्हटले आहे.
 
 काय होते ते ट्वीट 

जोफ्रा आर्चरने 16 जुलै 2014 रोजी एक ट्वीट केले होते. ‘Rhea and tessale ’, असे त्याने या ट्वीटमध्ये लिहिले  होते. रिया हे नाव आहे तर tessaleचा अर्थ होतो पेंडंट. साध्यासोप्या भाषेत सांगायचे तर लटकन. सुशांत सिंग राजपूतने कथितरित्या फासावर लटकून जीव दिला. त्यामुळे जोफ्रा आर्चरच्या या टिष्ट्वटचा संबंध लोकांनी रिया चक्रवर्तीशी जोडला आहे. जोफ्राला सहा वर्षांपूर्वी सगळे काही माहित होते, जोफ्रा आर्चर खरा अंर्तज्ञानी आहे, अशा प्रतिक्रिया या व्हायरल ट्वीटवर लोकांनी दिल्या आहेत.  

जोफ्रा आर्चर हा त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. इंग्लंडला 2019 च्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपचा चॅम्पियन बनवण्यात जोफ्रा आर्चरचे मोठे योगदान होते. सध्या जोफ्रा आर्चर विश्रांती घेत असून आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता आहे.

रियाची लवकरच सीबीआय चौकशी
 सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. लवकरच सीबीआय रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याची शक्यता आहे. सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात एफआयआर दाखल करत अनेक गंभीर आरोप केले होते.

Web Title: Twitterati Can’t Keep Calm After They Found Out Jofra Archer’s Tweet On ‘Rhea’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.