सगळ्या वेबसीरिजचा ‘बाप’ आला...! ट्विटरवर रंगली ‘Scam 1992’ची चर्चा खास
By रूपाली मुधोळकर | Published: October 20, 2020 01:05 PM2020-10-20T13:05:06+5:302020-10-20T13:15:44+5:30
शेअर मार्केट, हर्षद मेहता आणि 5 हजार कोटींचा घोटाळा... ; नेटकरी म्हणाले, मस्ट वॉच
चर्चित आणि वादग्रस्त व्यक्तिंवर वेबसीरिज बनवण्याचा ट्रेंड सध्या वाढला आहे. सध्या अशाच वादग्रस्त व्यक्तिच्या आयुष्यावरची वेबसीरिज चर्चेत आहे. होय, हर्षद मेहता या स्टॉक ब्रोकरवर बनलेली ‘स्कॅम 1992 - द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरिज ‘सोनी लिव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच प्रदर्शित झाली आणि लोकांना आवडली. ट्विटरवर ‘मस्ट वॉच’ म्हणत या वेबसीरिजची जोरदार चर्चा रंगली. आऊटस्टँडिंग, स्पीचलेस, असे काय म्हणत नेटक-यांनी ही सीरिज डोक्यावर घेतली.
#Scam1992 is fantastic! Definitely worth a watch. @nairsameer@mehtahansal
— Ekalavya Bhattacharya (@ekalavyab) October 10, 2020
वेबसीरिजमधील संवाद, दिग्दर्शन सगळ्यांचेच सध्या कौतुक होत आहे. मैं हिस्ट्री बनाना चाहता हूं और हिस्ट्री ऐसे ही नहीं बनती, मेरा सबसे बडा क्राईम कि मैं हर्षद मेहता हूं, मैं सिगरेट नहीं पीता पर जेब मैं लाइटर रखता हूं धमाका करने के लिए हे व असे अनेक संवाद या वेबसीरिजची शान आहेत. नेटकरीही या संवादाच्या प्रेमात पडले आहे.
#Scam1992 is so well made! Fabulous direction, set pieces, writing, dialogues and brilliant acting (what a cast!). Three episodes down and I'm absolutely riveted.
— Nikhil Taneja (@tanejamainhoon) October 10, 2020
Congratulations @mehtahansal@JaiHMehta@SumitPurohit@ofnosurnamefame@nairsameer.
(And so proud @shreya_dhan13!!)
प्रत्येक पात्राचा दमदार अभिनय, उत्तम दिग्दर्शन, कथेची मांडणी या सगळ्यांमुळे या वेबसीरिजला 9.6 IMDb रेटींग मिळाले आहे.
Two episodes down and #Scam1992 looks unarguably one of the best works of this year. Binge watching the episodes will totally give you a sleepless night. Making the story of such a subject in such an interesting and intriguing manner 🙌 Flawless acting and camera work! pic.twitter.com/luzmK94Psn
— Neel Joshi (@neeljoshiii) October 9, 2020
Dear @mehtahansal sir. Take a Bow. #Scam1992 is outstanding. Just finished watching the series and i am speechless
— Rohitt (@RohitSometimes) October 10, 2020
80 व 90 च्या दशकात एका घोटाळ्याने अख्खा शेअर बाजार हादरला होता. 5 हजार कोटींच्या या घोटाळ्याने हर्षद मेहता हे नाव चर्चेत आले होते. शून्यातून हिरो आणि हिरोचा विलेन बनलेल्या याच हर्षद मेहता नामक व्यक्तिची सत्यकथा या बेवसीरिजमध्ये दाखवण्यात आली आहे. 80-90 दशकात फक्त 40 रूपये घेऊन हर्षद मेहता मुंबईत येतो आणि बघता बघता शेअर बाजाराचा ‘बिग बुल’ बनतो आणि पुढे हाच ‘बिग बुल’ 5 हजार कोटींचा घोटाळा करून लोकांच्या नजरेत खलनायक ठरतो, त्याची ही कथा. देबाशीष बसू आणि सुचेता दलाल यांच्या ‘द स्कॅम’ या पुस्तकावर ही वेबसीरिज आधारित आहे. प्रतिक गांधी याने या वेबसीरिजमध्ये हर्षद मेहताची भूमिका साकारली आहे. त्याच्याशिवाय सतीश कौशिक, श्रेया धनवंतरी, निखील द्विवेदी, अनंत नारायण यांच्याही मुख्य भूमिका आहेत. शाहिद आणि अलिगढ यासारख्या सिनेमांचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ही वेबसीरिज दिग्दर्शित केली आहे.
हर्षद मेहता अडकला अन् झुनझुनवाला ठरले 'बिग बुल'; दिवसाची कमाई तब्बल ५.६ कोटी
Harshad Mehta: शेअर मार्केटमध्ये सर्वात मोठा घोटाळा करणाऱ्या हर्षद मेहताचं कुटुंब सध्या काय करतंय?