हद है चोरी की यार...! ऑलिम्पिकमध्ये इस्रायलचे राष्ट्रगीत वाजले अन् अनु मलिक ट्रोल झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 10:33 AM2021-08-02T10:33:29+5:302021-08-02T10:34:07+5:30
इस्रायलचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर नेटकऱ्यांना 1996 साली रिलीज झालेल्या ‘दिलजले’ या सिनेमातील ‘मेरा मुल्क मेरा देश’ हे गीत आठवले.
‘इंडियन आयडल 12’ हा सिंगींग रिअॅलिटी शो जज करत असलेले संगीतकार अनु मलिक (Anu Malik ) सध्या ट्रोल होत आहेत. तसे ट्रोल होणे अनु मलिक यांच्यासाठी नवे नाही. याआधी अनेकदा ते वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल झाले आहेत. शिवाय अनेकदा त्यांच्या म्युझिक कॉपी वा चोरी केल्याचा आरोपही लागला आहे. आता पुन्हा एकदा अनु मलिक यांच्यावर म्युझिक कॉपी केल्याच्या आरोप होत आहे आणि यामुळे ते सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होत आहेत. अनु मलिक यांनी कम्पोज केलेल्या एका गाण्याचे आणि इस्रायलच्या राष्ट्रगीताचे म्युझिक अगदी सारखे असल्याचा दावा अनेक नेटक-यांनी केला आहे. आता याचा शोध नेटक-यांना कसा लागला तर इस्रायलचा जिमनास्ट डोल्गोपायट याने ऑलिम्पिकमध्ये जिंकलेल्या सुवर्णपदानंतर वाजवण्यात आलेल्या त्याच्या देशाच्या राष्ट्रगीतानंतर. (Twitterati troll Anu Malik as Israel's national anthem played at Tokyo )
HAHAha.... Anu Malik literally copied Israeli National Anthem for a song.. And they noticed! in 2011 !! You cant make this up.. !! 😂 https://t.co/d8vNQEXbUO
— Sameer (@Sawei94) August 1, 2021
होय, जिमनास्ट डोल्गोपायट याने देशासाठी गोल्ड मेडल जिंकले. ऑलिम्पिकमध्ये जो खेळाडू सुवर्ण पदक जिंकतो त्याच्या देशाचं राष्ट्रगीत वाजवले जाते. त्यामुळे डोल्गोपायट जिंकल्यानंतर इस्रायलचे राष्ट्रगीत ‘हातिकवाह’ लावण्यात आले आणि यानंतर अनु मलिक ट्रोल झालेत.
It took 25 years and Olympic gold 🥇 to realise That Anu Malik copy "Mera Mulk Mera Desh"😅😅😅😅😅😅 https://t.co/Nrgd3uokSM
— ₭₳฿łⱤ ₱₳₮ɆⱠ (@kabeerbackup) August 1, 2021
इस्रायलचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर नेटक-यांना 1996 साली रिलीज झालेल्या ‘दिलजले’ या सिनेमातील ‘मेरा मुल्क मेरा देश’ हे गीत आठवले. इस्रायलच्या राष्ट्रगीताचे म्युझिक आणि अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे म्युझिक ब-याचअंशी सारखे आहे. यामुळे नेटक-यांनी अनु मलिक यांना ट्रोल करायला सुरुवात केली.
Arre @The_AnuMalik Israel ka national anthem tak nahi chhoda aapne! Ye bhi copy kar daala? Hadd hai chori ki yaar!
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) August 1, 2021
If there is any sports in Olympic for stealing music then Anu Malik could easily win a Gold Medal.
— Shiv Mishra (@Shivmishra_27) August 1, 2021
Bollywood copied Israel's national anthem tune, this is next level piracy 🤣🤣
— Gagan (@follow_Gagan) August 1, 2021
‘इस्रायलचे राष्ट्रगीत आणि दिलजले या चित्रपटातील मेरा मुल्क मेरा देश मेरा ये चमन गाण्यात साम्य आहे. अनु मलिकने या गाण्याला म्युझिक दिले आहे. मला 100 टक्के खात्री आहे की हे म्युझिक त्याने कॉपी केले असणार,’ असे एका युजरने लिहिले. ‘इस्रायलचे राष्ट्रगीतही सोडले नाही? ते सुद्धा कॉपी केले? चोरी करण्याची पण एक मर्यादा असते,’ अशा शब्दांत एका युजरने अनु मलिक यांची मजा घेतली. ‘ऑलिम्पिकमध्ये संगीत चोरण्याची स्पर्धा असती तर अनु मलिकला नक्कीच सुवर्ण पदक जिंकले असते,’ अशा शब्दांत एका युजरने अनु यांची खिल्ली उडवली.
अनु मलिक यांनी आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली आहेत. पण म्युझिक चोरीचा आरोप त्यांच्यावर यापूर्वीही अनेकदा झाला आहे.