Udit Narayan: "आम्ही सभ्य लोक आहोत", लाइव्ह शोमध्ये फॅनला किस केल्यानंतर उदित नारायण यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:25 IST2025-02-01T16:24:26+5:302025-02-01T16:25:30+5:30
लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका महिलेला उदित नारायण यांनी किस केलं. या व्हिडिओवरुन त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला असता. त्यानंतर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Udit Narayan: "आम्ही सभ्य लोक आहोत", लाइव्ह शोमध्ये फॅनला किस केल्यानंतर उदित नारायण यांची प्रतिक्रिया
बॉलिवूडमधील दिग्गज गायक उदित नारायण यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत ते लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान एका महिलेला किस करताना दिसत होते. या व्हिडिओवरुन त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला असता. त्यानंतर आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
लाइव्ह शो दरम्यानच उदित नारायण यांनी एका महिलेला किस केल्याचा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये उदित नारायण 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं गाताना दिसत आहेत. ते स्टेजवर परफॉर्म करत असताना एक महिला फॅन त्यांच्याबरोबर सेल्फी काढायला येते आणि त्यांच्या गालावर किस करत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर उदित नारायण त्या महिलेला लिप किस करत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले उदित नारायण?
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उदित नारायण यांनी HT City ला याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "फॅन्स एवढे वेडे असतात. आम्ही असे नाही आहोत. आम्ही सभ्य लोक आहोत. काही लोक अशा प्रकारे त्यांचं प्रेम व्यक्त करतात. खूप गर्दी असते आणि आमचे बॉडीगार्डही असतात. चाहत्यांना आम्हाला भेटायचा चान्स मिळतो. कोणी हात मिळवतं तर कोणी हाताला किस करतं. हा सगळा वेडेपणा असतो. यावर एवढं लक्ष नाही दिलं गेलं पाहिजे".
"माझं कुटुंबच असं आहे की सगळ्यांना वाटतं वाद व्हावेत. आदित्य शांत असतो. तो कोणत्याच वादात पडत नाही. मला बॉलिवूडमध्ये ४६ वर्षांपासून आहे. चाहत्याला जबरदस्तीने किस करू असा मी नाहीये. जेव्हा मला प्रेक्षकांचं प्रेम मिळतं तेव्हा मी हात जोडून त्यांना धन्यवाद म्हणतो", असंही ते पुढे म्हणाले.