‘उडता पंजाब’ वादानंतर आता ताक सुद्धा फुंकून....
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2016 02:00 PM2016-06-29T14:00:16+5:302016-06-29T19:30:16+5:30
‘उडता पंजाब’ आणि सेन्सॉर बोर्डाचा वाद चांगलाच गाजला. त्यामुळेच अनेक दिग्दर्शक व मेकर्स आता ताक सुद्धा फुंकून प्यायला लागले ...
‘ डता पंजाब’ आणि सेन्सॉर बोर्डाचा वाद चांगलाच गाजला. त्यामुळेच अनेक दिग्दर्शक व मेकर्स आता ताक सुद्धा फुंकून प्यायला लागले आहेत. येत्या २२ जुलैला ‘M Cream’ हा चित्रपट रिलीज होतो आहे. ‘उडता पंजाब’प्रमाणे हा चित्रपट सुद्ध ड्रग्ज या विषयाला वाहिलेला आहे. ‘उडता पंजाब’चा वाद इतका गाजल्यानंतर ‘M Cream’चे लेखक व दिग्दर्शक आग्नेय सिंह यांनी ताक सुद्धा फुंकून प्यायचा निर्णय घेतला. म्हणजेच सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्षा लीला सॅमसन यांनी पास केलेले चित्रपटाचे जुनेच version रिलीज करण्याचा निर्णय घेतला. खरे तर या चित्रपटाने ‘Rhode Island International Film Festival’मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ग्रॅण्ड प्राईज जिंकले होते. या महोत्सवात दाखवण्यात आलेल्या ‘M Cream’च्या आंतरराष्ट्रीयversionमध्ये आणखी एक गाणे आणि काही कमर्शिअल इलिमेंट टाकून हा चित्रपट भारतात प्रदर्शित व्हावा, असे आग्नेय यांची इच्छा होती. पण ‘उडता पंजाब’चा वाद बघता, सेन्सॉर बोर्ड हे version कदाचित पास करणार नाही, असे आग्नेय यांना अनेकांनी सांगितले. मग काय, आग्नेय यांनी २०१४ मध्ये एका मायनर कटसह ‘ए’ सर्टिफिकेट मिळालेले version रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. यालाच म्हणतात, ताक सुद्धा फुंकून पिणे...
इमाद शाह,इरा दुबे, औरित्रा घोष व राघव चनाना प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट म्हणजे चार मित्रांची कथा आहे. जे एम क्रिम (चरसचा एक प्राचीन प्रकार)च्या शोधात हिमाचल प्रदेशच्या यात्रेवर निघाला. मादक पदार्थ व नशा याभोवती हा चित्रपट फिरतो.
इमाद शाह,इरा दुबे, औरित्रा घोष व राघव चनाना प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट म्हणजे चार मित्रांची कथा आहे. जे एम क्रिम (चरसचा एक प्राचीन प्रकार)च्या शोधात हिमाचल प्रदेशच्या यात्रेवर निघाला. मादक पदार्थ व नशा याभोवती हा चित्रपट फिरतो.