धक्कादायक! पैशांसाठी आईनेच या अभिनेत्रीला ढकलले होते वेश्या व्यवसायात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 15:20 IST2019-11-19T15:15:21+5:302019-11-19T15:20:39+5:30

वयाच्या 20 व्या वर्षी सॉफ्ट पोर्न सिनेमा 'प्लेगर्ल'मधून करिअरला सुरुवात केली.

Uknow facts about adult star shakeela khan | धक्कादायक! पैशांसाठी आईनेच या अभिनेत्रीला ढकलले होते वेश्या व्यवसायात

धक्कादायक! पैशांसाठी आईनेच या अभिनेत्रीला ढकलले होते वेश्या व्यवसायात

शकीलाला साऊथच्या अ‍ॅडल्ट चित्रपटांची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. आज तिचा वाढदिवस आहे. शकीलाने आपल्या आयुष्यात अनेक चढ-उतारा पाहिले आहेत. शकीलाचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. कधी काळी आईने पैशासाठी शकीलाला वैश्या व्यवसायात ढकलले होते. शकीलाचे शिक्षण फक्त सहावीपर्यंतच झाले होते. शकीलने वयाच्या 20 व्या वर्षी सॉफ्ट पोर्न सिनेमा 'प्लेगर्ल'मधून करिअरला सुरुवात केली. यात शकीलाने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. शकीला मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सिनेमांमध्ये तिने काम केले आहे.   

2000 साली आलेला मल्याळम सिनेमा शकीलासाठी टर्निंग पॉईंट ठरला. या ‘किन्नर थुंबिकल’ या सिनेमानंतर लोक शकीलाला ओळखू लागले. मात्र बोल्ड अभिनेत्री म्हणूनच. आजपर्यत शकीलाने 250 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे. 


लवकरच शकीलाच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रिचा चढ्ढा शकीलाची भूमिका साकारणार आहे. या बायोपिकची निर्मिती इंद्रजित लंकेश करत आहेत. शकीला खानचा जीवनप्रवास पाहण्यासाठी रसिक उत्सुक असून रिचा शकीलाची भूमिका रुपेरी पडद्यावर कशी साकारते, हे पाहणे औत्सुकतेचे ठरेल.

Web Title: Uknow facts about adult star shakeela khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.