थिएटरनंतर आता जान्हवी कपूरचा 'Ulajh' OTT वर रिलीज! कुठे पाहता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 01:58 PM2024-09-29T13:58:10+5:302024-09-29T13:58:53+5:30

देशभक्तीने प्रेरित असलेल्या 'उलझ' सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर फारशी चालली नाही.

Ulajh OTT Release Date When & Where To Watch Janhvi Kapoor, Gulshan Devaiahs Film Online | थिएटरनंतर आता जान्हवी कपूरचा 'Ulajh' OTT वर रिलीज! कुठे पाहता येणार?

थिएटरनंतर आता जान्हवी कपूरचा 'Ulajh' OTT वर रिलीज! कुठे पाहता येणार?

ओटीटीवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेबसीरीज प्रदर्शित होत असतात.  ऑगस्ट महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आता  ओटीटीवर येत आहेत. गेल्या २ ऑगस्टला थिएटरमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'उलझ' सिनेमा रिलीज झाला होता. आता हा सिनेमा २७ सप्टेंबरला ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. तो तुम्ही कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता हे आपण जाणून घेऊया. 

देशभक्तीने प्रेरित असलेल्या 'उलझ' सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर फारशी चालली नाही. सुधांशू सारिया दिग्दर्शित हा थ्रिलर सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.  तुम्ही घरबसल्या 'उलझ' चा आनंद घेऊ शकता. रिलीजआधी या सिनेमाची खूप चर्चा होती. पण सिनेमा थिएटरमध्ये मात्र सपशेल आपटला. बॉलिवूड हंगामा नुसार, तर जान्हवी कपूरच्या 'उलझ'  या चित्रपटाने 2 आठवड्यात 8.30 कोटींचा व्यवसाय केला. 


'उलझ' या चित्रपटात जान्हवी कपूर भारतीय वन सेवा अधिकारीच्या (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसर -IFS) भूमिकेत आहे.  'उलझ' चित्रपटात देशाविरोधात रचलेले कट उधळवताना अभिनेत्री पाहायला मिळतेय.  गुलशन देवैया, आदिल हुसैन  आणि रोशन मॅथ्यू सारखे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.  'उलझ'ने यश मिळवले नाही मात्र, जान्हवीचा 'देवरा' चित्रपट हा ब्लॉकबास्टर ठरणार असल्याचं दिसून येत आहे. 

Web Title: Ulajh OTT Release Date When & Where To Watch Janhvi Kapoor, Gulshan Devaiahs Film Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.