UNCENSORED: दीपिका पदुकोणच्या ‘ट्रिपल एक्स’मधून ‘हे’ सीन्स करण्यात आले सेन्सॉर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2017 07:28 AM2017-01-22T07:28:21+5:302017-01-22T13:04:34+5:30

भारतीय सेन्सॉर बोर्ड फिल्म इंडस्ट्रीला सक्तीने शिस्त लावून अधिक ‘संस्कारी’ बनवू पाहत आहे. त्यांच्या या मोहीमेचा त्रास अभिव्यक्तीचा पुरस्कार ...

UNCENSORED: Deepika Padukone's 'Triple X' was sans 'sensor' | UNCENSORED: दीपिका पदुकोणच्या ‘ट्रिपल एक्स’मधून ‘हे’ सीन्स करण्यात आले सेन्सॉर

UNCENSORED: दीपिका पदुकोणच्या ‘ट्रिपल एक्स’मधून ‘हे’ सीन्स करण्यात आले सेन्सॉर

googlenewsNext
भारतीय सेन्सॉर बोर्ड फिल्म इंडस्ट्रीला सक्तीने शिस्त लावून अधिक ‘संस्कारी’ बनवू पाहत आहे. त्यांच्या या मोहीमेचा त्रास अभिव्यक्तीचा पुरस्कार करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांना सहन करावा लागतो. गेल्या वर्षी ‘उडता पंजाब’ला याचा फटका चांगलाच जबर बसला होता.

आपली दीपिका पदुकोण हॉलीवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या ‘ट्रिपल एक्स : रिटर्न आॅफ द झेंडर केज’ या चित्रपटावरदेखील सेन्सॉर बोर्डाची कात्री चालवण्यात आली आहे. विन डिझेलसोबत दीपिकाचा विदेशी अवतार पाहताना ‘भारतीय प्रेक्षकां’च्या मनावर वाईट संस्कार होऊ नयेत याची काळजी घेत पहलाज निहलानी यांनी अत्यंत सफाईदारपणे या चित्रपटातील त्यांना आक्षेपार्ह वाटणारे शब्द व सीन्स कापले आहेत.

ALSO READ: २०१६मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचे ७ उदाहरणे

आता हे सीन्स कोणते असतील याची तुम्हाला उत्सुकता लागली असेल ना? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ‘अ‍ॅसहोल’, ‘सन आॅफ अ बीच’, ‘बॉल्स’ आणि ‘एफ-वर्ड’ यासारख्या शिव्यांना कात्री लावने समजू शकतो; परंतु ‘बॉलर’सारखा शब्द ज्याचा अर्थ ‘कूल व्यक्ती’ आहे तो काढून टाकण्या मागचा तर्क कळण्या पलिकडचा आहे.

Nihlani
सेन्सॉरमॅन : पहलाज निहलानींनी ‘उडता पंजाब’ या चित्रपटातील तब्बल ८९ सीन्स कापून सेन्सॉरने कहरच केला होता. ​(Photo Credit : The Quint)

त्यानंतर निहलानींनी कात्री सीन्सकडे वळवली. ‘पलंगावर झोपलेल्या मुली’ आणि ‘दारू सर्व्ह करणाऱ्या मुलीं’चे सीन्स वगळण्यात आले आहेत. यामुळे आपली संस्कृती बिघडेल की काय अशी भीती सेन्सॉर बोर्डाला वाटत असावी कदाचित. किसिंग सीन्स, तोकडे कपडे, शिवीगाळाला सेन्सॉरने नेहमीच विरोध केला आहे; परंतु अलिकडे बोर्डाने जरा जास्तच कडक भूमिका घेतली आहे.

ALSO READ: पहलाज निहलानीं दुटप्पीपणा ‘एक्सपोझ’

मागच्या वर्षी शाहीद कपूर स्टारर ‘उडता पंजाब’ या चित्रपटातील तब्बल ८९ सीन्स कापून सेन्सॉरने कहरच केला होता. निर्माता अनुराग कश्यपने त्यावेळी पहलाज निहलानींविरुद्ध जोरदार मोहीम उडली होती. अखेर बोर्डाने माघार घेत एक कटसह ‘उडता पंजाब’ला पास केले.

त्याआधी, ‘स्पेक्टर’ या जेम्स बाँड चित्रपटातील दीर्घ इंटिमेट सीनवर कात्री लावण्यात आली होती. ‘जंगल बुक’सारख्या बालचित्रपटाला ‘ए’ सर्टिफिके ट दिल्यामुळेदेखील वाद झाला होता. करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’मधील ऐश्वर्या राज आणि रणबीर कपूरचे अनेक रोमॅण्टिक सीन कट करण्यात आले होते. 

                                            

via GIPHY

Web Title: UNCENSORED: Deepika Padukone's 'Triple X' was sans 'sensor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.