मिनाक्षी शेषाद्री या प्रसिद्ध गायकासोबत होती नात्यात, तिच्यासाठी पत्नीसोबत घेतला होता घटस्फोट?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 07:00 AM2019-07-19T07:00:00+5:302019-07-19T07:00:07+5:30
मिनाक्षी शेषाद्री चित्रपटसृष्टीत असताना तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असायचे.
मिनाक्षी शेषाद्री गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. ती परदेशात स्थायिक झाली असून तिने काही वर्षांपूर्वी घायल वन्स अगेन या चित्रपटात काम केले होते. तिचे लग्न हरिश मैसूर यांच्यासोबत झाले असून ते इन्व्हेस्टमेंट बँकर आहेत. मिनाक्षीने घायल वन्स अगेन या चित्रपटात काम करण्यापूर्वी तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. कारण या फोटोत ती खूपच बदललेली दिसत होती.
मिनाक्षीने हिरो, बेवफाई, दिलवाला, दामिनी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला जुर्म आणि दामिनी या चित्रपटांसाठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मिनाक्षीने १९९८ मध्ये स्वामी विवेकानंद या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. बॉलिवूडपासून दूर राहून ती आपल्या पतीला आणि कुटुंबियांना वेळ देत आहे. ती अभिनय क्षेत्रात नसली तरी आपली नृत्याची आवड जोपासत आहे.
मिनाक्षी चित्रपटसृष्टीत असताना तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असायचे. तुम्हाला माहीत आहे का एका प्रसिद्ध गायकासोबतचे तिचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. या गायकाच्या पत्नीने आमच्या घटस्फोटासाठी मिनाक्षीच कारणीभूत असल्याचे म्हटले होते.
जब कोई बात बिगड जाये हे मिनाक्षी शेषाद्रीवर चित्रीत करण्यात आलेले गाणे कुमार सानूने गायले असल्याचे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. याच कुमार सानू आणि मिनाक्षीचे अनेक वर्षं अफेअर होते. कुमार सानूची पहिली पत्नी रिटाने त्यांच्या घटस्फोटासाठी मिनाक्षीला जबाबदार धरले होते. १९९४ला प्रकाशित झालेल्या फिल्मफेअर मासिकानुसार कुमारची पत्नी रिटाने घटस्फोटाची केस दाखल करताना मिनाक्षी त्यांच्या घटस्फोटासाठी कारणीभूत असल्याचे घटस्फोटाच्या कारणामध्ये लिहिले होते. फिल्मफेअरमध्ये ही बातमी आल्यानंतर या बातमीची चांगलीच चर्चा झाली होती. पण मिनाक्षीने यावर मौन राखणेच पसंत केले होते.
घटस्फोटाबद्दल रिटाने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मी गरोदर असताना कुमार सगळे पैसे मिनाक्षीवर उघळत होता. त्यावेळी माझ्याकडे एक रुपयादेखील नसायचा. मिनाक्षी आणि कुमार यांच्याविषयी सुरुवातीला मला कळल्यावर मिनाक्षीसारखी सुसंस्कृत मुलगी असे करू शकेल यावर माझा विश्वासच बनला नव्हता. पण नंतर मला सगळ्या गोष्टी हळूहळू करून कळायला लागल्या.