बिनधास्त, बेधडक नायक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2016 08:01 PM2016-11-19T20:01:11+5:302016-11-19T20:01:11+5:30

बरेचसे अभिनेते बेधडकपणे वावरतात. त्यांना ‘बेफिक्रे’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्यांची वानवा नाही. आपली बॉडी ...

Unimportant, rude hero | बिनधास्त, बेधडक नायक

बिनधास्त, बेधडक नायक

googlenewsNext
ेचसे अभिनेते बेधडकपणे वावरतात. त्यांना ‘बेफिक्रे’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्यांची वानवा नाही. आपली बॉडी दाखविण्यात हे अभिनेते सातत्याने पुढे असतात. सलमान खान याच्यापासून शर्टलेस फिरण्याची सुरुवात झाली म्हटलं तर वावगे ठरणार नाही. आता त्याच्यापाठोपाठ इतर अभिनेतेही बिनधास्त वावरताना दिसतात.
सलमान खान



आपल्या बॉडीच्या जोरावर सिनेसृष्टीत आपले स्थान अबाधित राखणारा सलमान हा आजकालच्या हिरोजचा आदर्श आहे, असं म्हटलं तर चुकीचे नाही. त्याच्या प्रत्येक चित्रपटातून तो शर्टलेस फिरताना दिसतो. त्याला ‘टॉपलेस हिरो’असेही म्हटले जाते.
जॉन अब्राहम



बॉडी असणाºया अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमचेही नाव येते. दररोज दोन ते तीन तास व्यायाम करणे हे जॉन अब्राहमचे वैशिष्ट्य. अनेक चित्रपटातून त्याचे मसल्स आपणास पहावयास मिळाले आहेत.
हृतिक रोशन



अभिनेता हृतिक रोशन हा आपले सिक्स पॅक दाखविताना बºयाच वेळा दिसतो. त्याचे बायसेप्स अँड मसल्स बºयाच चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. अनेक चित्रपटातून हृतिक शर्टलेस दिसून आला आहे.
अक्षय कुमार



अक्षय कुमार हा बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जातो. अनेक चित्रपटांमधून त्याने आपली बॉडी दाखविली आहे. पहाटे उठून व्यायाम करणाºयांमध्ये तो अग्रभागी आहे.
वरुण धवन



अभिनेता वरुण धवननेही अनेक चित्रपटांमधून आपले अ‍ॅब्ज दाखविले आहेत. जिममध्ये बºयाचवेळा वर्कआऊट करताना तो दिसून येतो. त्याने काही दिवसांपूर्वी यासंदर्भातील व्हिडिओही पोस्ट केला होता.
शाहरुख खान



शाहरुख खाननेही मधल्या काळात आपल्या बॉडीवर अनेक प्रयोग केले होते. सिक्स पॅक अ‍ॅब्ज दाखविण्यासाठी त्याने व्यायामही मोठ्या प्रमाणावर केला होता. त्याच्यामुळे सिक्स पॅकचे प्रमाण वाढले होते.
सनी देओल



‘ढाई किलो का हात’ असणारा सनी हा प्रत्येक चित्रपटात हाणामारीसाठी परफेक्ट माणूस आहे. शर्ट काढला की सनी देओलची फाईट असणार हे नक्की असते. सनी देओल हा केवळ बॉडी दाखविण्यासाठी फेमस नाही.







Web Title: Unimportant, rude hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.