सौंदर्यात बॉलिवूडमधील अभिनेत्रींना टक्कर देते केंद्रीय मंत्री निशंक यांची लेक, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 15:06 IST2021-02-13T15:06:04+5:302021-02-13T15:06:04+5:30
Union HRD Minister Ramesh Pokhriyal's Daughter Arushi Nishank All Set To Make Bollywood Debut : आता राजकीय क्षेत्रातील आणखी एका मंत्र्याची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सौंदर्यात बॉलिवूडमधील अभिनेत्रींना टक्कर देते केंद्रीय मंत्री निशंक यांची लेक, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
आता राजकीय क्षेत्रातील आणखी एका मंत्र्याची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी आरुषी निशंक एका युद्धपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे सांगितले जात आहे.
मंत्री रमेश पोखरियाल यांच्या जवळच्यांनी आरुषीच्या बॉलिवूड पदार्पणाच्या बातमीला दुजोरा दिला. भारतीय सैन्यातील सहा साहसी महिला अधिकाऱ्यांच्या पराक्रमावर आधारित एका युद्धपटातून ती बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. यात तिच्यासमवेत प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू, भूमि पेडणेकर, कीर्ती कुल्हारी यांच्याशिवाय आणखी दोन अभिनेत्री असणार आहेत.
दरम्यान, या सिनेमाच्या दिग्दर्शनासंदर्भात ‘उरी – द सर्जिकल स्ट्राइक’चे दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी बातचीत झाली असल्याचे सांगितले जात आहे. दिग्दर्शनासाठी त्यांना पहिली पसंती देण्यात आली असली तरी आदित्य धर हे सध्या रॉनी स्क्रूवाला यांची निर्मिती असलेल्या ‘अश्वत्थामा’ या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शन्सच्या कामात व्यग्र आहे.
या चित्रपटाच्या आधी ती एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. ही माहिती खुद्द तिनेच दिली होती की टी सीरिजसाठी तिने रोहित सुचंतीसोबत एक म्युझिक अल्बम शूट केला आहे. याची घोषणा लवकरच टी-सीरिज करणार आहे.
टी सीरिजच्या अधिकाऱ्यांनीही आरुषीच्या चित्रपटासंदर्भात खुलासा केला. ही महिलाप्रधान सिनेमा असून युद्धपटांमध्ये आतापर्यंत पुरुष अधिकाऱ्यांच्या पराक्रमावर चित्रपट बनले आहेत. या चित्रपटाच्या नावाबरोबरच त्याच्याशी संबंधित अन्य माहिती पुढील काळात जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.