लग्नाच्या वेळी प्रग्नेंट होती बॉलिवूडची ही अभिनेत्री, या अभिनेत्यासोबत केलं होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 12:51 IST2019-12-03T12:41:33+5:302019-12-03T12:51:37+5:30
लग्नाच्या काही वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. सध्या मुलाचा सांभाळ ती एकटी करतेय.

लग्नाच्या वेळी प्रग्नेंट होती बॉलिवूडची ही अभिनेत्री, या अभिनेत्यासोबत केलं होतं लग्न
बॉलिवूडची अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने आपल्या अभिनयाच्या कौशल्यावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोंकणाने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेवर आपली एक वेगळी छाप सोडली आहे. कोंकणा सेनचे वडील मुकुल शर्मा सुप्रसिद्ध पत्रकार आहेत तर आई अपर्णा सेन एक नामांकित दिग्दर्शिका आहेत. कोंकणा तिच्या प्रोफेशनल लाईफ इतकीच पर्सनल लाईफला घेऊन सुद्धा चर्चेत राहिली.
शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘एक जे आछे कन्या’ या बंगाली चित्रपटातून कोंकणाला लीड भूमिका मिळाली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत दिसली. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि कोंकणा हिट झाली. २००२ मध्ये कोंकणाने सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांच्या ‘तितली’मध्ये भूमिका साकारली.
२००५ मध्ये कोंकणाने मधूर भांडारकर यांच्या ‘पेज 3’ या हिंदी चित्रपटात लीड भूमिका साकारली. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. कोंकणाने आई अपर्णाने दिग्दर्शित केलेल्या ‘मि. अॅण्ड मिसेस अय्यर’ या इंग्रजी सिनेमात देखील तिने काम केले. याकरता तिला बेस्ट अॅक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्ड मिळाला.
कोंकणाच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. ‘आजा चल ले’ या चित्रपटाच्या सेटवर तिची रणवीर शौरीसोबत ओळख झाली. यानंतर दोघांचेही प्रेम झाले. यादरम्यान कोंकणा लग्नाआधीच प्रेग्नंट राहिली. यानंतर दोघांनीही घाईघाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला.सप्टेंबर २०१० मध्ये तिने बॉयफ्रेन्ड रणवीर शौरीसोबत लग्न केले. लग्नाच्यावेळी कोंकणा प्रेग्नेंट होती. लग्नाच्या सहा महिन्यानंतर कोंकणाने एका मुलाला जन्म दिला. यानंतर 2015 मध्ये रणवीर आणि कोंकणाचा घटस्फोट झाला.