बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्रीची बिकट अवस्था, घरातल्या वस्तू विकून भागवते घरखर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 05:00 PM2021-05-11T17:00:02+5:302021-05-11T17:15:17+5:30
. गेल्या काही वर्षापासून ती आर्थिक अडचणीत आहे. कमाईचं कोणतंही साधन नसल्यामुळे घरातल्या वस्तूच विकून आपला उदरनिर्वाह चालवते.
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रत्येकालाच हिमालयाएवढं यश किंवा लोकप्रियता मिळत नाही. मोजक्या कलाकारांनाच ते कसब उत्तमरित्या जमतं. ते बराच काळ रसिकांच्या गळ्यातले ताईत बनून राहतात. मात्र काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे विजेता पंडित.
अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. ८० च्या दशकात आपल्या अभिनय आणि गायनाने बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे विजेता पंडीत सध्या अशाच कठिण परिस्थितून जातेय. कुमार गौरवसह अभिनेत्री विजेताने ‘लव्ह स्टोरी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती.
दोघांच्या अभिनयाचे कौतुकही झाले. सिनेमाही सुपरहिट ठरला. मात्र पहिल्या सिनेमानंतर अभिनेत्री विजेता मात्र सिनेसृष्टी फार काही कमाल दाखवू शकली नाही. विजेताबद्दल आजही लोकांना फार कमी माहिती आहे. करिअरप्रमाणे विजेताचे खाजगी आयुष्यातही तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.
विजेताचे दोन लग्न झाली आहेत. पहिले लग्न हे दोन वर्षातच मोडले म्हणून दुस-यांदा लग्न केले. संगीतकार आदेश श्रीवास्तवसह तिने दुस-यांदा संसार थाटला पण नियतीच्या मनात काही ओरच होते. आदेश श्रीवास्तवचेही कर्करोगाने मृत्यू झाला आणि ती पुन्हा एकटी पडली. विजेताला जगण्यासाठी आजही फार कष्ट करावे लागत आहे. गेल्या काही वर्षापासून ती आर्थिक अडचणीत आहे. कमाईचं कोणतंही साधन नसल्यामुळे घरातल्या वस्तूच विकून आपला उदरनिर्वाह चालवते.
विशेष म्हणजे संगित कुटुंबात विजेताचा जन्म झाला आहे. तिच्या वडिलांचे नाव प्रताप नरेन पंडित असून ते एक प्रसिद्ध संगीतकार होते. पंडित जसराज विजेताचे काका होते. सुलक्षणा पंडित, ललित पंडित, संध्या पंडित, मंदीर पंडित, जतिन पंडित आणि माया पंडित हे सात भावंडे आहेत. तिचे भाऊ जतिन-ललित हे बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आहेत.