‘तू सुंदर नाहीस’ म्हणत अनेक निर्मात्यांनी दिला होता नकार, आज आहे तिच अभिनेत्री बॉलिवूडची स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 08:00 AM2021-04-30T08:00:00+5:302021-04-30T08:00:11+5:30

तिच्या चेह-यावरून तिला बरेच काही ऐकवले गेले.

Unkown facts about actress radhika madan bollywood journey | ‘तू सुंदर नाहीस’ म्हणत अनेक निर्मात्यांनी दिला होता नकार, आज आहे तिच अभिनेत्री बॉलिवूडची स्टार

‘तू सुंदर नाहीस’ म्हणत अनेक निर्मात्यांनी दिला होता नकार, आज आहे तिच अभिनेत्री बॉलिवूडची स्टार

googlenewsNext

राधिका मदानने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली. ‘मेरी आशिकी...तुम्ही से ही’ या मालिकेत ती झळकली होती. या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. उद्या राधिका आपला 25वा वाढदिववस साजरा करणार आहे. राधिकाचा जन्म दिल्लीतल्या पीतमपुरामध्ये झाला. वयाच्या 19व्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.

राधिका मदनला कधी काळी चेहरा सुंदर नाही म्हणून अनेकांनी नकार दिला होता. निर्मात्यांना राधिकाच्या अभिनयाबद्दल काहीही तक्रार नव्हती. पण तिच्या चेह-यावरून तिला बरेच काही ऐकवले गेले. तू सुंदर नाहीस, असे म्हणत अनेक निर्मात्यांनी तिला सुरूवातीच्या काळात चित्रपटास घेण्यास नकार दिला होता.

लूक्समुळे नाकारण्यात आलेल्या राधिकाला पुढे ‘पटाखा’ हा पहिला सिनेमा मिळाला आणि या चित्रपटातील तिच्या अ‍ॅक्टिंगने सगळ्यांची मने जिंकलीत. अर्थात यानंतरही तिचा संघर्ष संपला नाही. ‘पटाखा’नंतर ‘अंग्रेजी मीडियम’ हा इरफानचा सिनेमा मिळणे, ही राधिकासाठी एक मोठी संधी होती. पण हा चित्रपट मिळवण्यासाठी राधिकाला ब-याच दिव्यातून जावे लागले. होय, त्याचे असे होते की, ‘अंग्रेजी मीडियम’ राधिकाने साकारलेली भूमिका निर्माता-दिग्दर्शक एका स्टार किडला देऊ इच्छित होते. (या चित्रपटासाठी सारा अली खानचे नाव चर्चेत होते.) राधिकाला ही भूमिका तिच्या हातून जाऊ द्यायची नव्हती. तिने कसेबसे निर्मात्यांना राजी केले. अनेक आॅडिशन्स देण्याची तयारी दर्शवली. तेव्हा कुठे निर्मात्यांनी हा रोल राधिकाला दिला.

Web Title: Unkown facts about actress radhika madan bollywood journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.