Sushant Singh Rajput birth anniversary: सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी हे प्रश्न आजही आहेत अनुत्तरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 12:41 PM2021-01-21T12:41:15+5:302021-01-21T12:55:44+5:30

सुशांतच्या निधनाला सात महिन्यांपासून अधिक कालावधी झाला असला तरी त्याच्या निधनाशी संबंधीत अनेक गोष्टी आजही अनुत्तरीत आहेत.

unremained answers of sushant singh rajput suicide case | Sushant Singh Rajput birth anniversary: सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी हे प्रश्न आजही आहेत अनुत्तरीत

Sushant Singh Rajput birth anniversary: सुशांत सिंग आत्महत्येप्रकरणी हे प्रश्न आजही आहेत अनुत्तरीत

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले की सुशांतने निधनाच्या काही दिवस आधी जवळजवळ ५० सिम कार्ड बदलले होते. सुशांतला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळत असल्याने तो सतत नंबर बदलत होता असे म्हटले जाते.

सुशांत सिंग राजपूत सारखा एक उमदा स्टार काही महिन्यांपूर्वी या जगाला अलविदा म्हणत निघून गेला. पण त्याच्या खास चाहत्यांच्या मनात तो आजही जिवंत आहे. त्याचे चाहत्यांच्या मनातील स्थान अढळ आहे आणि राहील. सुशांत आज हृयात असता तर ३५ वर्षांचा झाला असता. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुशांतचे फॅन्स त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

३४ वर्षीय सुशांत गेल्यावर्षी १४ जूनला त्याच्या घरी फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या अकाली एक्झिटने बॉलिवूडसह अख्ख्या देशाला मोठा धक्का बसला होता. सुशांतचा मृत्यू कशाने झाला, याचा तपास अद्यापही सुरू आहे. सीबीआय, ईडी, एनसीबी अशा यंत्रणांचा तपास सुरुच आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. रियाने सुशांतचा पैसा हडपला, त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

सुशांतच्या निधनानंतर मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली असल्याचे मीडियाशी बोलताना सांगितले होते. पण चौकशी योग्यरित्या केली नाही असा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. 

सुशांतच्या निधनाला सात महिन्यांपासून अधिक कालावधी झाला असला तरी त्याच्या निधनाशी संबंधीत अनेक गोष्टी आजही अनुत्तरीत आहेत.  पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले की सुशांतने निधनाच्या काही दिवस आधी जवळजवळ ५० सिम कार्ड बदलले होते. सुशांतला अंडरवर्ल्डकडून धमकी मिळत असल्याने तो सतत नंबर बदलत होता असे म्हटले जाते. त्याला मिळत असलेल्या धमक्यांबाबत पोलिसांनी चौकशी का केली नाही. तसेच सुशांतची रूम उघडायला ड्युप्लिकेट चावी बनवण्यात आली होती, त्याचा पोलिसांनी का तपास केला नाही. तसेच सीसीटिव्ही का चेक करण्यात आला नाही असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना आजही पडलेले आहेत. तसेच सिद्धार्थ पठानी हा सुशांतचा खूपच जवळचा मित्र होता. तो त्याच्यासोबतच राहात होता. पण त्याने पोलिसांना दिलेले जबाब अनेकवेळा बदलले. 

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयने चौकशी करू नये असे रियाचे सुरुवातीला म्हणणे होते. पण नंतर तिनेच सोशल मीडियावर पोस्ट करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत अनेक केसेस चांगल्याप्रकारे हाताळल्या आहेत. असे असताना देखील मुंबई पोलिसांच्या चौकशीवर शंका का उपस्थित करण्यात आली. सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सॅलियनच्या निधनानंतर काहीच दिवसांत सुशांतने आत्महत्या केली होती. दिशाच्या निधनाचा सुशांतच्या आत्महत्येशी संबंध होता असे म्हटले जात होते. सीबीआयने याबाबत चौकशी देखील केली होती. पण त्यांना कोणताच पुरावा मिळाला नाही. 

सुशांत डिप्रेशनमध्ये असल्याचे रियाने सीबीआय चौकशी दरम्यान सांगितले होते. पण सुशांतच्या स्टाफ आाणि कुटुंबियांना याबाबत काहीच माहिती नव्हती. केवळ त्याच्या बहिणीने तो डिप्रेशनमध्ये असल्याचे मान्य केले होते. पण तो डिप्रेशनमध्ये जाण्याचे कारण काय होते हे स्पष्ट झाले नाही.  

Web Title: unremained answers of sushant singh rajput suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.