क्या करूँ राम मुझे बुड्ढा मिल गया, रिया चक्रवर्तीचं मुकेश भट्टसही होती जवळीक, पाहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 08:59 PM2020-08-20T20:59:02+5:302020-08-20T20:59:47+5:30
मुकेश भट्ट आणि रियाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला आहे. रिया आणि मुकेश भट्ट यांचा हा व्हिडीओ 'जलेबी' सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यानचा आहे.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. तर दुसरीकडे सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपविली आहे. अशात रिया चक्रवर्तीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होतोय या व्हिडीओ मुकेश भट्टसह ती मीडियाच्या कॅमे-यांना पोज देत असल्याचे पाहायला मिळते. रिया चक्रवर्तीचे महेश भट्ट यांच्यासह जवळीक होती. जसे महेश भट्ट सांगायचे अगदी तसंच ती करायची. मात्र रियाची महेश भट्टसह जवळीक होती असे नाही तिचे मुकेश भट्ट यांच्यासह खूप चांगले संबध होते. सध्या मुकेश भट्ट आणि रियाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला आहे. रिया आणि मुकेश भट्ट यांचा हा व्हिडीओ 'जलेबी' सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यानचा आहे.
मुकेश भट्ट सुशांतच्या आत्महत्येविषयी टाइम्स नाऊ टीव्ही चॅनेलवर म्हणाले होती की, मुकेश भट्ट म्हणाले की, 'तो माझ्याकडे आला होता. मी त्याच्याशी बोललोही होतो, त्याच्या बोलण्यातून मला जाणवले की तो अस्वस्थ आहे. मग मला समजले की, त्याच्याबरोबर काहीतरी चुकीचे घडत आहे. आम्ही 'सडक 2' मध्ये एकत्र काम करण्याचा विचार करत होतो. मुकेश भट पुढे म्हणाले, 'आम्ही बराच वेळ चर्चा करत होतो. पण त्यावेळी मला चटकन समजलं की तो कुठेतरी हरवलेला आहे. काहीतरी आहे ज्यामुळे तो गोंधळला आहे हे मला तेव्हाच जाणवलं होतं. त्याचं बोलण्याकडे पूर्ण लक्ष नव्हतं. हे सर्व एक-दीड वर्षांपूर्वी घडलं होतं आणि मला तेव्हाच तो खूपच डिस्टर्ब असलेला जाणवलं. आम्ही बोलत असताना जणू तो त्या ठिकाणीच नव्हता.
जेव्हा मी सुशांतचं निरिक्षण केलं होतं तेव्हा मी माझ्या भावाला म्हटलं होतं. मला भीती वाटते की हा मुलगा परवीन बाबीच्या पावलावर पाऊल तर ठेवत नाही आहे ना? त्याच्या आत्महत्येबद्दल जेव्हा मला समजलं तेव्हा मला धक्का बसला नाही कारण मला ते आधीच जाणवलं होतं. असेही धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं.