Uorfi Javed : अरेरे! उर्फी जावेदच्या चेहऱ्याची वाईट अवस्था; ट्रोलिंगला कंटाळून नको ते केलं, आता होतोय पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 05:59 PM2023-07-17T17:59:40+5:302023-07-17T18:09:35+5:30
Uorfi Javed : सोशल मीडियावर उर्फीने स्वत:च याबाबत माहिती दिली आहे.
विचित्र फॅशनमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा चेहरा खराब झाला आहे. सोशल मीडियावर उर्फीने स्वत:च याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्रीला तिच्या कपड्यांव्यतिरिक्त डार्क सर्कलमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. तिच्या फोटोमध्ये नेहमीच डार्क सर्कल दिसतात. मात्र आता ट्रोलिंगला कंटाळून तिने ट्रिटमेंट केली पण त्याचा विपरित परिणाम झाला आहे.
डार्क सर्कल लपविण्यासाठी उर्फीने आय फिलर केले, परंतु हे केल्यानंतर तिच्या डोळ्यांखाली सूज आली आहे आणि फिलरमुळे ती खूप वेगळी दिसत आहे. आय फिलरनंतर तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लेटेस्ट फोटो अपलोड केला. ज्यामध्ये डोळयांच्या खाली सूज आणि रेडनेस पाहायला मिळत आहे. फोटो शेअर करत अभिनेत्रीने स्वतःबद्दलच राग व्यक्त केला आहे. मेकअप केल्यावर देखील डोळे चांगले दिसणार नाहीत असं म्हटलं आहे.
अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "मी माझ्या डार्क सर्कलमुळे खूप ट्रोल होत होती. म्हणूनच अंडर आय फिलर केलं आहे आणि आता त्यामुळे माझा चेहरा खराब झाला आहे. माझ्या डोळ्यांखालील भाग वेगळा दिसत आहे. मी स्वत: सोबत असं का केलं?"
अंडर आय फिलर करण्यापूर्वी, अभिनेत्रीने लिप फिलर देखील केलं होतं, ज्याचा फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. आता अभिनेत्रीने पुन्हा तिच्या इन्स्टा स्टोरीचा एक फोटो शेअर केला असून त्यात तिचा लूक खूपच वेगळा आहे. अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे यामध्ये लिप फिलर केल्यानंतर तिचे ओठ सुजले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.