Aryan Khan Drugs Case: आर्यनला 'बिग बॉस' फेम उर्फीचा पाठिंबा, म्हणाली...बलात्कार प्रकरणात लोकांना इतका राग का येत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 07:33 PM2021-10-13T19:33:07+5:302021-10-13T19:35:20+5:30
Aryan Khan Drugs Case: 'बिग बॉस' फेम उर्फी जावेद (Urfi Javed) हिनं बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला पाठिंबा दिला आहे.
Aryan Khan Drugs Case: 'बिग बॉस' फेम उर्फी जावेद (Urfi Javed) हिनं बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला पाठिंबा दिला आहे. आर्यन खानला सध्या एनसीबीनं ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली असून तो आर्थर रोड तुरुंगात आहे. या प्रकरणाची एनसीबीकडून चौकशी सुरू असून ड्रग्ज रॅकेटच्या संपर्कात असल्याचे आरोप आर्यनवर करण्यात आले आहेत. आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानला पाठिंबा देण्यासाठी काही सेलिब्रिटी देखील पुढे येताना दिसत आहेत. त्यात आता उर्फी जावेद हिनं एक वादग्रस्त विधान करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"कोर्टाचा निर्णय येण्याआधीच लोक आर्यनवर यासाठी टीका करुन लागले आहेत कारण की तो सुपरस्टार शाहरुखचा मुलगा आहे. हत्या आणि बलात्कार प्रकरणांमध्ये याच पद्धतीचा आक्रोश का दाखवला जात नाही. आपल्याला कोर्टाचा निर्णय येण्याआधीच अभिनेत्यांची निंदा करण्याची खूप घाई असते. जेव्हा एखाद्या बलात्काऱ्याबाबत संताप व्यक्त करण्याची वेळ येते तेव्हा आपण याप्रकरणा इतकीच घाई का करत नाही?", असं विधान उर्फी जावेद हिनं केलं आहे.
उर्फी जावेद हिनं बड़े भैया की दुल्हनिया’, ‘मेरी दुर्गा’ आणि 'बेपनाह' सारख्या मालिकांमधून टेलिव्हिजन विश्वात प्रसिद्धी प्राप्त केली आहे. "राजकीय नेते, धार्मिक गुरू देखील बलात्कारासारख्या गंभीर आरोपांचा सामना करत आहेत. बलात्कारासारखे गंभीर आरोप असूनही त्यांची पूजा केली जाते आणि आपण आज एका लहान मुलाच्या हात धुवून मागे लागलो आहोत. ज्यानं कुणालाच कोणतीही दुखापत किंवा नुकसान पोहोचवलेलं नाही. तरीही सार्वजनिक पातळीवर त्याला खूप बदनाम केलं जात आहे", असं उर्फी जावेद म्हणाली.
आर्थर रोड तुरुंगात आहे आर्यन खान
क्रूझ पार्टीत ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान सध्या मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानचा खटला सुप्रसिद्ध ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे लढत होते. पण आता शाहरुख खाननं गुन्हे प्रकरणातील निष्णात वकील अमित देसाई यांच्याकडे खटला सोपवला आहे. आर्यन सध्या १४ दिवसांच्या कोठडीत आहे.