Uorfi Javed : अरेरे! उर्फीने पैशांसाठी प्रेमाला मारली लाथ; 'असं' काही म्हणाली जे ऐकून पोरांना आला प्रचंड राग
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 04:23 PM2023-06-07T16:23:47+5:302023-06-07T16:32:28+5:30
Uorfi Javed :उर्फी जावेद विचित्र कपड्यांसाठी, हटके फॅशनसाठी ओळखली जाते, त्यासोबतच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहे.
उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांसाठी, हटके फॅशनसाठी ओळखली जाते, त्यासोबतच ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही प्रसिद्ध आहे. एका मुलाखतीत उर्फीने असे गुपित उघड केलं आहे की जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. अभिनेत्री कधी टी बॅगचे कपडे बनवते, कधी फळं, कधी फुलं, तर कधी टॉपलेस होऊन बाहेर पडते. शरीर झाकण्यासाठी कपड्यांची गरज नाही, असं उर्फी जावेदचं मत आहे.
जे मिळेल त्याने शरीर झाकून टाका अशी विचारसरणी असलेल्या उर्फी जावेदला यामुळे खूप ट्रोल केलं जाते. तरा काही लोक उर्फी आजच्या तरुणाईला बिघडवत असल्याचं देखील म्हणतात. पण यामुळे उर्फीला काही फरक पडत नाही. अशाच एका मुलाखतीत उर्फीला जेव्हा प्रेमाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.
एक काळ असा होता जेव्हा ती खूप रोमँटिक होती. ती खूप लवकर सर्वांच्याच प्रेमात पडायची, पण आता ती परिस्थिती बदलली आहे. उर्फीला आता प्रेमात अजिबात रस नाही कारण आता तिच्याकडे पैसे आहेत. आधी तिच्याकडे भरपूर मोकळा वेळ होता, पण आता खूप काम आहे. उर्फीची ही गोष्ट लोकांना अजिबात आवडलेली नाही.
लोक म्हणतात की, उर्फीसाठी फक्त पैसा महत्त्वाचा आहे. पैशांसाठी ती काहीही करू शकते. उर्फीने आपल्य़ा इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरून नेहमीच बोल्ड फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतात. तसेच ती आपलं मत देखील बिनधास्तपणे मांडते. एका हिंदी वेबसाईटने याबाबातचे वृत्त दिले आहे.