Urfi Javed : 'उर्फी जावेद' ला कॅमेऱ्यासमोरच कोसळले रडू, चाहते म्हणतात हा काय नवीन ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:01 AM2022-12-01T09:01:52+5:302022-12-01T09:02:55+5:30

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद म्हणलं की काहीतरी विचित्र कपडे घातलेली उर्फीच डोळ्यासमोर येते. मात्र यावेळी उर्फी वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. उर्फी कॅमेऱ्यासमोर चक्क रडताना दिसली आहे. 

urfi-javed-cried-on-camera-in-splitsvilla-14-she-gets-into-argument-with-kashish thakur | Urfi Javed : 'उर्फी जावेद' ला कॅमेऱ्यासमोरच कोसळले रडू, चाहते म्हणतात हा काय नवीन ड्रामा

Urfi Javed : 'उर्फी जावेद' ला कॅमेऱ्यासमोरच कोसळले रडू, चाहते म्हणतात हा काय नवीन ड्रामा

googlenewsNext

Urfi Javed :  सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद म्हणलं की काहीतरी विचित्र कपडे घातलेली उर्फीच डोळ्यासमोर येते. मात्र यावेळी उर्फी वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. उर्फी कॅमेऱ्यासमोर चक्क रडताना दिसली आहे. 

उर्फी जावेद सध्या रिअॅलिटी शो Splitsvilla 14 'स्प्लिट्सव्हिला १४' मध्ये सहभागी आहे. आता उर्फी टीव्हीवर दिसणार म्हणून स्प्लिट्सव्हिला चा टीआरपी सुद्धा वाढला आहे. हा शो सनी लिओनी आणि अर्जुन बिजलानी होस्ट करत आहेत. पण उर्फीची क्रेझ त्यांच्यापेक्षाही जास्त दिसतीये. या शो मधील उर्फीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तिचे कशिश ठाकुर या स्पर्धकासोबत भांडण होते. 'मला तुझ्यासोबत राहायचे नाही, आय एम डन' असे ती कशिशला म्हणते.आणि तिला रडू कोसळते. उर्फी आणि कशिश ची जोडी चाहत्यांना खुप आवडत होती मात्र आता हे भांडण झाल्याने चाहतेही निराश झाले आहेत. उर्फी आणि कशिशची जोडी अशीच राहावी असेच चाहत्यांना वाटते. मात्र आता पुढे काय होते याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. 

Urfi Javed : 'तुझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींना तु...' चेतन भगतवर उर्फी जावेद भडकली

उर्फी आणि कशिशचे प्रेम भांडणात कधी बदलले असा प्रश्न चाहत्यांना पडलाय.  कोणी म्हणते कशीश आणि प्रेमाची च जोडी छान होती त्यांनीच एकत्र यावे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर हा काय नवीन ड्रामा आहे असे म्हणत चाहते  चिडले आहेत.

Web Title: urfi-javed-cried-on-camera-in-splitsvilla-14-she-gets-into-argument-with-kashish thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.