Urfi Javed : उर्फी जावेदला व्हॉट्सअॅप कॉलवरुन बलात्काराची धमकी; तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 02:09 PM2022-12-18T14:09:10+5:302022-12-18T14:10:45+5:30

बोल्ड आणि विचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी ऊर्फी जावेद सतत काही ना काही कारणाने चर्चेत असते. आता तर तिला थेट जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे.

urfi-javed-gets-threatening-whatsapp-call-complains-of-receiving-rape-threats | Urfi Javed : उर्फी जावेदला व्हॉट्सअॅप कॉलवरुन बलात्काराची धमकी; तक्रार दाखल

Urfi Javed : उर्फी जावेदला व्हॉट्सअॅप कॉलवरुन बलात्काराची धमकी; तक्रार दाखल

googlenewsNext

Urfi Javed : बोल्ड आणि विचित्र फॅशनसाठी ओळखली जाणारी ऊर्फी जावेद सतत काही ना काही कारणाने चर्चेत असते. आता तर तिला थेट जीवे मारण्याची आणि बलात्काराची धमकी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवर कॉलवरुन अश्लील आणि गलिच्छ भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

ऊर्फी तिच्या विचित्र फॅशनमुळे अनेक लोकांचा रोष ओढवून घेत आहे. आता तिला व्हॉट्सअॅपवर कॉलवरुन अश्लील भाषेत शिवीगाळ करून बलात्काराची आणि जिवे मारण्यातची धमकी देण्यात आली आहे. तिच्या फॅशनवर गलिच्छ भाषेत टिप्पणी करण्यात आली आहे.  या प्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये नविन गिरी नावाच्या व्यक्तीविरोधात  तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

उर्फी जावेदविरोधात काही दिवसांपूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती. अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत तिच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती. आता मात्र तिला बलात्काराचीही धमकी येत आहे. त्यामुळे उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

 

Web Title: urfi-javed-gets-threatening-whatsapp-call-complains-of-receiving-rape-threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.