Urfi Javed : 'तुझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींना तु...' चेतन भगतवर उर्फी जावेद भडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 09:26 IST2022-11-27T09:24:45+5:302022-11-27T09:26:19+5:30
नेहमीच आपल्या कपड्यांवरुन चर्चेत असणारी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदवर यावेळी प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीही टीका केली आहे. तर ...

Urfi Javed : 'तुझ्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींना तु...' चेतन भगतवर उर्फी जावेद भडकली
नेहमीच आपल्या कपड्यांवरुन चर्चेत असणारी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदवर यावेळी प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीही टीका केली आहे. तर चेतन भगतच्या टीकेवर ऊर्फी ने सडेतोड उत्तर दिले आहे.
काय म्हणाले चेतन भगत ?
'तरुण वर्ग उर्फीचे फोटो लाईक करत आहेत. यामध्ये उर्फीची चुक नाही कारण ती फक्त तिचे करिअर बनवत आहे. इंटरनेट चांगली गोष्ट हे मात्र यात तरुण चुकीच्या दिशेला जात आहेत. पूर्ण दिवस तरुण रील्स बघत आहेत. बेडवर जाऊन उर्फीचे फोटो बघत आहेत.'
उर्फीने चेतन भगतला सुनावले
चेतन भगत यांनी केलेल्या टीप्पणीनंतर उर्फी चांगलीच भडकली. तिने इंन्स्टाग्राम पोस्ट मध्ये लिहिले, 'जेव्हा स्वत:हून अर्ध्या वयाच्या मुलींना मेसेज करत होता तेव्हा मुलींच्या कपड्यांमुळे भरकटले गेले होता का ? असेच पुरुष असतात जे आपल्यातला कमीपणा लपवण्यासाठी महिलांना चुक ठरवतात. माझ्या कपड्यांमुळे तरुण भटकत आहेत तुम्ही तरुण मुलींना मेसेज करायचा ते त्यांना भरकटवणारे नव्हते का?
रेप कल्चरला प्रोत्साहन देणे आधी तुम्हीच बंद करा.पुरुषांच्या वागण्यावरुन महिलांना दोषी ठरवणं ८०च्या काळात होत असेल. महिलांनाच दोषी ठरवा. तुमच्यासारखे लोक तरुणांना बिघडवत आहेत. '
उर्फी जावेदवर आत्तापर्यंत अनेकांनी टीका केली आहे. पण तिने सर्वांना सडेतोड उत्तरे दिली आहेत. तरी ती तसेच कपडे घालून बाहेर येते आणि पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनते. ट्रोलर्सच्या कायम निशाण्यावर असते.