'उर्फी'च्या ड्रॅगन ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष; ट्रान्सपरंट ब्लॅक आऊटफीट लूक व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 17:54 IST2023-05-28T17:52:44+5:302023-05-28T17:54:23+5:30
उर्फीला नुकतेच एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी, तिने परिधान केलेला ड्रेस पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या.

'उर्फी'च्या ड्रॅगन ड्रेसने वेधले सर्वांचे लक्ष; ट्रान्सपरंट ब्लॅक आऊटफीट लूक व्हायरल
आपल्या हटके आणि अंगप्रदर्शनात्मक ड्रेस स्टाईलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद कधी कोणती स्टाईल घेऊन कॅमेऱ्यासमोर येईल हे सांगता येत नाही. आता, ड्रॅगन स्टाईलच्या ट्रान्सपरंट ड्रेसमुळे ती चर्चेत आली आहे. उर्फीच्या फॅशन सेन्सवरुन अनेकदा तिला ट्रोल केलं जातं. काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात चांगलाच वादही रंगला होता. उर्फीच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार केली होती. मात्र, तरीही उर्फीने आपली स्टाईल सोडली नाही.
उर्फीला नुकतेच एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी, तिने परिधान केलेला ड्रेस पाहून अनेकांनी भुवया उंचावल्या. ड्रॅगन डिझाईनचा अटायर ड्रेस तिने परिधान केला होता. तिचा या लूकमधील फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला. उर्फीच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकची चर्चाही होत आहे. उर्फीने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये काळ्या रंगाचे ड्रॅगनचे डिझाईन दिसून येते. उर्फीचा हा आऊटफीट फ्रॅब्रिकमधील ड्रेसने धुमाकूळ घातला आहे.
या ड्रेसमध्ये ती नेहमीप्रमाणे कॉन्फिडन्ट वॉक करताना दिसून येते. याशिवाय तिला आवाज देणाऱ्यांसोबतही ती संवाद साधत आहे. बॅकसाईडला हा ड्रेस पूर्णपणे पारदर्शक असून बॅकलेस आहे. याशिवाय या ड्रेसमधून तिचे दोन्ही पाय पूर्णपणे दिसत आहेत. एकंदरीतच पायातील सँडल, टान्सपरंट ड्रॅगन ड्रेस आणि केसांच्या हटके हेअरस्टाईलमुळे उर्फीचा हा लूक तुफान व्हायरल होत आहे.