उर्फी म्हणते, माझ्या  जीवाला धोका...; सुरक्षेसाठी महिला आयोगाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 10:44 AM2023-01-16T10:44:19+5:302023-01-16T10:44:56+5:30

उर्फीची ही तक्रार महिला आयोग मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवणार

Urfi says, my life is in danger...; Letter to the Commission for Women's Safety | उर्फी म्हणते, माझ्या  जीवाला धोका...; सुरक्षेसाठी महिला आयोगाला पत्र

उर्फी म्हणते, माझ्या  जीवाला धोका...; सुरक्षेसाठी महिला आयोगाला पत्र

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून, उर्फीने ई-मेलद्वारे महिला आयोगाला पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी आपल्याला धमकावले असल्याने आपल्या असुरक्षित वाटत असल्याचे उर्फीने या ई-मेलमध्ये म्हटले 
आहे. उर्फीची ही तक्रार महिला आयोग मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवणार आहे.

उर्फी जावेदच्या कपड्यांवर वारंवार आक्षेप घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. शनिवारी पोलिसांनी उर्फीला चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर रविवारी उर्फीने यावर कडी करण्याचा प्रयत्न करत महिला आयोगाकडे एकप्रकारे वाघ यांच्याविरोधात अप्रत्यक्ष तक्रारच केली आहे.

मला धमक्या देण्याची गरज नाही. मी फक्त इशारा दिला असल्याचे याप्रकरणी प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. अशी उघडी नागडी फिरू नको एवढेच माझे म्हणणे असून, असे म्हणणे धमकी आहे का?, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

तक्रार मुंबई पोलिस आयुक्तांकडे पाठवणार!

दोन दिवसांपूर्वी उर्फीने महिला आयोगात येऊन तक्रार केली होती, पण ती तक्रार लेखी नव्हती. आपल्याला कशा पद्धतीने त्रास दिला जातो, कोण धमकी देते हे तिने सांगितले होते. शनिवारी तिने लेखी तक्रार केली आहे. त्या तक्रारीत आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले असून, पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. तिची ही तक्रार महिला आयोगाकडून मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवणार आहोत. -रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

Web Title: Urfi says, my life is in danger...; Letter to the Commission for Women's Safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.