'उरी' सिनेमाचा निर्माता रोनी स्क्रूवालाने केली ही घोषणा, ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 02:42 PM2019-01-16T14:42:55+5:302019-01-16T14:49:41+5:30
उरी-द सर्जिकल हा सिनेमा पाहताना आपले उर जेवढे अभिमानाने भरुन येते तशीच अभिमानास्पद गोष्ट या सिनेमाच्या निर्मात्यांने केली आहे.
उरी-द सर्जिकल हा सिनेमा पाहताना आपले ऊर जेवढे अभिमानाने भरून येते तशीच अभिमानास्पद गोष्ट या सिनेमाच्या निर्मात्याने केली आहे. आर्मी दिवसाचे औचित्य साधत निर्माता रोनी स्क्रूवाला यांनी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या विधवा पत्नींसाठी एक कोटींची मदत जाहीर केली आहे. उरी-द सर्जिकल स्ट्राइक सिनेमाने आतापर्यंत 46 कोटींच्या वर गल्ला जमवला आहे. सिनेमाच्या प्रॉडक्शन हाऊस आरएसवीपीने सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या विधवा पत्नींसाठी एक कोटींची मदत जाहीर केली.
#UriTheSurgicalStrike is unshakable... Excellent on Day 4... Higher than Day 1... Will cross ₹ 50 cr today... Trending better than #Raazi, #Stree and #BadhaaiHo... Fri 8.20 cr, Sat 12.43 cr, Sun 15.10 cr, Mon 10.51 cr. Total: ₹ 46.24 cr. India biz. #Uri#HowsTheJosh
— taran adarsh (@taran_adarsh) 15 January 2019
उरी सिनेमाचे डायलॉग रसिकांना खूपच आवडले आहेत.‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’ हे डायलॉग रसिकांना खूपच भावले. जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर सर्जिकल स्ट्राइकने देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित ‘उरी’ हा सिनेमा आहे. चित्रपटाची कथा विहान शेरगिल या भारतीय जवानाभोवती फिरते. ही भूमिका विकी कौशलने साकारली आहे. तूर्तास विकीच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. दिग्दर्शक आदित्य धारने सर्जिकल स्ट्राइकच्या १० दिवसांतील चित्तथरारक घटना मोठ्या पडद्यावर उत्तमरीत्या रेखाटल्या असून, हे प्रसंग पाहताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. यामी गौतमच्या वाटेला छोटी भूमिका आली आहे; मात्र या छोट्या भूमिकेलाही तिने योग्य न्याय दिला आहे. परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या भूमिका छोट्या - छोट्या असल्या तरी त्यांनी त्या सक्षमपणे साकारल्या आहेत. आतापर्यंत आपण अनेक वेळा सर्जिकल स्ट्राइकबाबत वाचलेय किंवा ऐकलेय; मात्र ही संपूर्ण घटना रुपेरी पडद्यावर पाहणे रोमांचकारी ठरते.