Box Office Collection : ‘उरी’चा बॉक्स ऑफिसवर कब्जा! बजेट वसूल!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 11:55 AM2019-01-14T11:55:58+5:302019-01-14T11:57:03+5:30
‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ गत शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि दोनचं दिवसांत या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली. विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर ‘उरी’ने दोनचं दिवसांत २० कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवत, बॉक्स ऑफिस वर कब्जा केला.
‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ गत शुक्रवारी प्रदर्शित झाला आणि दोनचं दिवसांत या चित्रपटाने प्रेक्षकांची पसंती मिळवली. विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर ‘उरी’ने दोनचं दिवसांत २० कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवत, बॉक्स ऑफिस वर कब्जा केला. या कमाईने बड्या बड्या ट्रेड एक्स्पर्टलाही अचंबित केले. तूर्तास या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचा जबरदस्त लाभ मिळतोय.
#UriTheSurgicalStrike witnesses remarkable growth on Day 2 [Sat]... Glowing word of mouth is converting into BO numbers... Growth on Day 2 [vis-à-vis Day 1]: 51.59%... Day 3 [today] should be bigger... Fri 8.20 cr, Sat 12.43 cr. Total: ₹ 20.63 cr. India biz. #Uri
— taran adarsh (@taran_adarsh) January 13, 2019
रिलीजच्या पहिल्या दिवशी ‘उरी’ने ८.२० कोटींचा बिझनेस केला. यानंतर दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी १२.४३ कोटींचा गल्ला जमवला. तर काल रविवारी तिस-या दिवशी सुमारे १४ कोटींची कमाई केली. (नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही) एकूण रकमेत सांगायचे तर आत्तापर्यंत चित्रपटाचे सुमारे ३४ कोटींचा बिझनेस केला आहे. ‘उरी’चा बजेट २५ कोटी होता. कमाईचा आकडा बघता हा बजेट कधीचाच वसूल झाला आहे. येत्या दिवसांत कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने या हल्ल्याचे चोख उत्तर सर्जिकल स्ट्राइकने देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित ‘उरी’ हा सिनेमा आहे. चित्रपटाची कथा विहान शेरगिल या भारतीय जवानाभोवती फिरते. ही भूमिका विकी कौशलने साकारली आहे. तूर्तास विकीच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक होत आहे. दिग्दर्शक आदित्य धारने सर्जिकल स्ट्राइकच्या १० दिवसांतील चित्तथरारक घटना मोठ्या पडद्यावर उत्तमरीत्या रेखाटल्या असून, हे प्रसंग पाहताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. यामी गौतमच्या वाटेला
छोटी भूमिका आली आहे; मात्र या छोट्या भूमिकेलाही तिने योग्य न्याय दिला आहे. परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांच्या भूमिका छोट्या - छोट्या असल्या तरी त्यांनी त्या सक्षमपणे साकारल्या आहेत. आतापर्यंत आपण अनेकवेळा सर्जिकल स्ट्राइकबाबत वाचलेय किंवा ऐकलेय; मात्र ही संपूर्ण घटना रुपेरी पडद्यावर पाहणे रोमांचकारी ठरते.