Pic of the Day: राज बब्बर व रेखासोबतच्या ‘या’ चिमुरडीला ओळखलंत? एकेकाळी होती सुपरस्टार, सध्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 18:20 IST2022-09-02T18:17:00+5:302022-09-02T18:20:01+5:30
Pic of the Day: सोशल मीडियावर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल होतोय. अभिनेते राज बब्बर आणि रेखासोबत दिसणाऱ्या या चिमुकलीचा फोटो सध्या तुफान चर्चेत आहे

Pic of the Day: राज बब्बर व रेखासोबतच्या ‘या’ चिमुरडीला ओळखलंत? एकेकाळी होती सुपरस्टार, सध्या...
चला तर, सोशल मीडियावर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल होतोय. अभिनेते राज बब्बर आणि रेखासोबत दिसणाऱ्या या चिमुकलीचा फोटो सध्या तुफान चर्चेत आहे. तिला तुम्ही ओळखलंत? या चिमुकलीने वयाच्या 6 व्या वर्षी मराठी चित्रपटातून अॅक्टिंग करिअर सुरू केलं होतं. पुढे ती बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांत झळकली. आता ती राजकारणात सक्रीय आहे. अद्यापही तुम्ही तिला ओळखलं नसेल तर आम्ही सांगतो.
ही चिमुकली अन्य कुणी नसून बॉलिवूडची ‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) आहे. उर्मिलाने 1980 साली ‘झाकोळ’ या चित्रपटापासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. यानंतर कलयुग, मासूम, डकैत, बडे घर की बेटी यासारख्या चित्रपटात दिसली. उर्मिलाने तिच्या करिअरमध्ये कमल हासनपासून नसीरूद्दीन शाह, अजय देवगण, अनिल कपूर, ऋषी कपूर, संजय दत्त अशा अनेकांसोबत काम केलं. 1994 साली आ गले लग जा या चित्रपटात ती जुगल हंसराजसोबत झळकली. यानंतर रामगोपाल वर्माच्या ‘रंगीला’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली. तिचा हा चित्रपट तुफान गाजला.
प्यार तुने क्या किया, एक हसीना थी, सत्या, खूबसूरत, जंगल, पिंजर, भूत अशा अनेक हिट सिनेमात तिने काम केलं. गायकीतही तिने नशीब आजमावलं. आशा भोसले यांच्या आशा अॅण्ड फ्रेंड्स वॉल्यूम 1 मध्ये तिने गाणं गायलं. आशा भोसलेही तिच्या आवाजाच्या फॅन बनल्या.
टीव्हीवर उर्मिलाने झलक दिखला जा, चक धूम धूम असे रिअॅलिटी शो जज केलेत. सध्या ती राजकारणात सक्रीय आहे. 2019 मध्ये तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. लोकसभा निवडणूकही लढली. अर्थात या निवडणुकीत तिला पराभव पत्करावा लागला. 2020 साली उर्मिलाने शिवसेनेत प्रवेश केला. उर्मिलाचा अखेरचा सिनेमा 2018 साली आला होता. तेव्हापासून ती मोठ्या पडद्यापासून दूर आहे.