Urmila Matondkar ने शिवसेनेत येताच Kangana Ranaut वर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 11:01 AM2020-12-02T11:01:33+5:302020-12-02T11:02:14+5:30
उर्मिला मातोंडकरने हे मान्य केलंय की, तिचं नाव महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका उमेदवाराच्या रूपाने सुचवलं गेलं आहे.
बॉलिवू़ड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसच्या तिकीटावर २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. पण नुकताच तिने नव्याने शिवसेनेत प्रवेश केलाय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत सामिल होताच उर्मिला मातोंडकरने अभिनेत्री कंगना रनौतला टोमणा मारत तिला 'unnecessary importance' म्हणजे अनावश्यक महत्व मिळत असल्याचं म्हणाली.
शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेत नामांकनासाठी उर्मिला मातोंडकरचं नाव नुकतंच राज्यपाल बी एस कोशियारी यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं. शिवसेनेत प्रवेश केल्यावर मीडियाशी बोलताना उर्मिला म्हणाली की, अभिनेत्री कंगना रनौतला 'अनावश्यक महत्व' दिलं गेलंय.
कंगनावरील प्रश्नाने भडकली उर्मिला
मीडियासोबत बोलताना कंगना म्हणाली की, 'मी याआधी केलेली वक्तव्ये एका मोठ्या मुलाखतीचा भाग होते. पण कंगनाबाबत जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आले होते. मला वाटतं की, तिला अनावश्यक महत्व दिलं गेलं आहे आणि माझा तिला अधिक महत्व देण्याचा काहीच विचार नाही'.
विधान परिषदेची उमेदवार आहे उर्मिला
उर्मिला मातोंडकरने हे मान्य केलंय की, तिचं नाव महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका उमेदवाराच्या रूपाने सुचवलं गेलं आहे. मला माझ्या राजकीय जीवनात महिलांच्या मुद्द्यांवर काम करायचं आहे.
कॉंग्रेस का सोडली
जेव्हा उर्मिलाला कॉंग्रेसच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, तिने तो पक्ष सोडला आहे. पण सामाजिक सेवा नाही सोडली. तिने खुलासा केला की, 'मी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाने आणि कामाने प्रभावित झाले आहे. त्यामुळे मी त्यांच्या पक्षात येण्याचा निर्णय घेतला. पक्षात प्रवेश घेण्याआधी मला उद्धव ठाकरे यांनी स्वत: फोन केला होता'.