ऋषभ पंत की नसीम शाह... कोणाला डेट करतेय उर्वशी; चोरानं केली आयफोनची सर्च हिस्ट्री लीक?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 02:10 PM2023-10-16T14:10:55+5:302023-10-16T14:16:09+5:30

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात आयफोन गमावल्यावर नेटकऱ्यांनी अभिनेत्री उर्वशी रौतेलाला ट्रोल केलं.

Urvashi Rautela 24 Carat Gold IPhone Lost During Pak India Match Thief Leaked Search History | ऋषभ पंत की नसीम शाह... कोणाला डेट करतेय उर्वशी; चोरानं केली आयफोनची सर्च हिस्ट्री लीक?

ऋषभ पंत की नसीम शाह... कोणाला डेट करतेय उर्वशी; चोरानं केली आयफोनची सर्च हिस्ट्री लीक?

अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच चर्चेत असते. भारत विरुद्ध पाकिस्तानचा क्रिकेट सामना पाहणं उर्वशीला चांगलंच महागात पडलं.  मॅच पाहताना उर्वशीने तिचा आयफोन गमावला आहे. तिचा हा आयफोन साधासुधा नाही तर 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा होता. फोन गमावल्याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.  यावर मात्र काही जण तिच्या निष्काळजीपणाची खिल्ली उडवत आहेत.

 उर्वशीने फोन हरवल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली. ‘अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेट खऱ्या सोन्याचा फोन हरवला आहे. जर कोणाला हा फोन सापडला तर कृपया माझी मदत करा. मला तातडीने संपर्क करा’, असं तिनं लिहलं. तिच्या या पोस्टवर  सहानुभूती दाखवण्याऐवजी नेटकऱ्यानी तिला ट्रोल केलं आहे. तर काहींनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. 

एका यूजरने लिहिले की, 'चोराने तुमचा सर्च हिस्ट्री लीक केली आहे'. तर एकाने लिहिले आहे की, 'ही ताई लक्ष वेधण्यासाठी काहीही करते'. तर दुसर्‍याने म्हटलं , 'मला आज सकाळी स्टेडियमची सफाई करताना मोबाईल सापडला. तर आणखी एका युजरने लिहिलं की, 'नसीम शाह तर आला नव्हता, मग तुमचं लक्ष कुठं होतं'. ऐवढचं नाही तर एका युजरने लिहलं की, मला उर्वशीचा आयफोन सापडला असून ऋषभ पंत आणि नसीम शाह यांच्यापैकी ती कुणाला डेट करतेय हे मला कळालं आहे. 

सोशल मीडियावर तर काहींनी थेट ऋषभ पंतला ‌टॅग केलं आहे. उर्वशी आणि ऋषभ हे दोघं एकमेकांना डेट करत होते, अशी चर्चा होती. मात्र ऋषभने या चर्चा फेटाळल्या होत्या. तर यातच  तिचे नाव पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नसीम शाहसोबतही जोडले गेले होते. कारण, उर्वशीने त्याला वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या होत्या, ज्यावर नसीमने तिचे आभारही मानले होते. त्यामुळे युजर्संनी ऋषभ आणि नसीम या दोघांवरुन तिला ट्रोल केलं.

View this post on Instagram

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटी 2 विजेता एल्विश यादवसोबत एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. त्यांच्या दोन्ही गाण्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. लवकरच ती काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. ज्याची तिचे चाहते खूप वाट पाहत आहेत.

Web Title: Urvashi Rautela 24 Carat Gold IPhone Lost During Pak India Match Thief Leaked Search History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.