"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:38 IST2025-04-19T12:37:50+5:302025-04-19T12:38:16+5:30
उर्वशी रौतेलाने बद्रीनाथजवळ तिच्या नावाने मंदिर असल्याचा मोठा दावा केला. त्याबद्दल स्थानिक पुजाऱ्यांनी खरं काय ते सांगितलं

"माझ्या नावाचं मंदिर, तिथे लोक पूजा करतात"; उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, पुजाऱ्याने सगळी स्टोरी सांगितली
उर्वशी रौतेला (urvashi rautela) ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर जो हल्ला झाला त्याबद्दल विचित्र वक्तव्य करुन उर्वशी ट्रोल झाली. आता उर्वशीच्या नवीन वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. नुकतंच उर्वशीने एका मुलाखतीत, उत्तराखंडमधील बद्रीनाथजवळ तिच्या नावाने एक मंदिर आहे, असं वक्तव्य केलं. यामुळे स्थानिक पुजारी आणि रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उर्वशीला लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागतंय. काय म्हणाली उर्वशी?
उर्वशी मुलाखतीत काय म्हणाली?
सिद्धार्थ कानन यांना दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी म्हणाली की,"बद्रीनाथजवळ माझ्या नावाने एक मंदिर आहे. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी त्या मंदिरात येतात, माझ्या फोटोला हार घालतात आणि मला 'दमदमामाई' म्हणतात. मी हे अत्यंत गंभीरपणे बोलत आहे. यावर बातम्याही आल्या आहेत." असं सांगताच उर्वशीने सर्वांना आश्चर्यचकित करुन सोडलंय.
उर्वशी याच मुलाखतीत पुढे म्हणाली की, "गेल्या काही वर्षांमध्ये मी साऊथमध्ये अनेक सिनेमे आणि तेथील अभिनेत्यांसोबत काम केलं.साउथमधील सुपरस्टारच्या नावाने चाहते मंदिरं बांधतात. मग माझ्या चाहत्यांनीही माझं मंदिर का बांधू नये?" उर्वशीच्या या वक्तव्यानंतर स्थानिक पुजारी काय म्हणाले जाणून घ्या.
उर्वशीने केलेल्या या वक्तव्यानंतर पुजाऱ्यांचा संतापब
स्थानिक पुजारी आणि धार्मिक संघटनांनी या उर्वशीने केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. बद्रीनाथचे माजी धार्मिक अधिकारी आणि पुजारी भुवन चंद्र उनियाल यांनी स्पष्ट केले की, "उर्वशी मंदिर हे देवी उर्वशीला समर्पित आहे, जी हिंदू पुराणांनुसार देवी सतीचं एक रूप आहे. या मंदिराचा उर्वशी रौतेलाचा कोणताही संबंधित नाही."
स्थानिक रहिवाशांनीही या दाव्याचा विरोध केला आहे. त्यांनी सांगितले की, "उर्वशी मंदिर हे बामणी गावाजवळ आहे आणि ते प्राचीन काळापासून देवी उर्वशीला समर्पित आहे. अशा प्रकारचे दावे धार्मिक भावना दुखावणारे आहेत." या वादानंतर सोशल मीडियावरही उर्वशी रौतेला यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याशिवाय अनेकांनी उर्वशीच्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला, असंही म्हटलं आहे.