बघावं ते नवलच ! उर्वशी रौतेलाचा हटके फॅशन फंडा, कानातले पाहून चाहते झाले थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:30 PM2021-08-11T19:30:00+5:302021-08-11T19:30:00+5:30

उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे. ‘बॉलिवूडची फॅशन क्वीन’ उर्वशी रौतेलाने नुकतेच तिच्या खास फोटोशूटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Urvashi Rautela Earing Caught Attention OF Everyone, See Her Unique Fashion Sense | बघावं ते नवलच ! उर्वशी रौतेलाचा हटके फॅशन फंडा, कानातले पाहून चाहते झाले थक्क

बघावं ते नवलच ! उर्वशी रौतेलाचा हटके फॅशन फंडा, कानातले पाहून चाहते झाले थक्क

googlenewsNext

सोशल मीडियावर उर्वशी रौतेला आपल्या स्टाइलचा जलवा दाखवत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सिनेमापेक्षा ती जास्त स्टाइल स्टेटमेंटमुळेच चर्चेत असते.  आपल्या स्टाईल आणि फॅशनने साऱ्यांनाच प्रभावित केले आहे. महागड्या फॅशनसाठी ओळखली जाणारी उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. 

आताही उर्वशी रौतेला प्रकाशझोतात येण्याचे कारण तितकेच युनिक आहे. ‘बॉलिवूडची फॅशन क्वीन’ उर्वशी रौतेलाने नुकतेच तिच्या खास फोटोशूटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताच प्रचंड व्हायरल होत आहे. एरव्ही उर्वशी सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होती मात्र आता हटके फॅशन स्टाईलनेही लक्ष वेधून घेत आहे.

 

यावेळी उर्वशीच्या भल्यामोठ्या कानातले साऱ्यांसाठी आकर्षणाच केंद्र ठरले आहेत. उर्वशीचे कानातले पाहून चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत. तर एकीकडे तिच्या या लूकची वाहवाही चाहते करत आहे. तिचा हा अंदाज तिच्या सौंदर्याला शोभावा असाच असल्याचे चाहते कमेंट्स करत तिचे कौतुकही करताना दिसत आहे. बॉलीवुडची ट्रेंडसेटर अभिनेत्री म्हणूनही उर्वशी आता आपली नवी ओळख निर्माण करताना दिसत आहे. 

तिच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकल्यास तुम्हाला तिच्या विविध अदा पाहायला मिळतील.तसेच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे उर्वशीचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.याआधीही विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

Web Title: Urvashi Rautela Earing Caught Attention OF Everyone, See Her Unique Fashion Sense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.