बोल्ड फोटो नाही तर या कृतीमुळे उर्वशी रौतेला आलीय चर्चेत, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:00 PM2020-05-12T12:00:05+5:302020-05-12T12:00:47+5:30
होय, बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींप्रमाणेच उर्वशीही कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावली आहे. दिले इतके कोटी...
‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर स्वत:चे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून ती सतत चर्चेत असते. पण आता याच हॉट उर्वशीची चर्चा होतेय ती एका वेगळ्या आणि तितक्याच सुंदर कारणासाठी. होय, बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींप्रमाणेच उर्वशीही कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुढे सरसावली आहे.
होय, उर्वशीने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 5 कोटी रूपयांची मदत केली. विशेष म्हणजे एका डान्स मास्टरक्लासच्या माध्यमातून तिने ही रक्कम उभी केली आणि नंतर गरजुंना दान केली.
उर्वशीने नुकतेच एक व्हच्युअल डान्स मास्टरक्लासचे आयोजन केले होते. यात डान्स शिकण्यास, वजन कमी करण्यास इच्छूक लोकांसाठी एक मोफत सेशन ठेवण्यात आले होते. या माध्यमातून उर्वशीने सुमारे 1 कोटी 80 लाख लोकांना झुम्बा, लॅअिन डान्स असे सगळे प्रकार शिकवले. यासाठी उर्वशीला 5 कोटींची रक्कम मिळाली, ही सगळी रक्कम तिने गरजुंसाठी दान केली. तूर्तास यासाठी उर्वशीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने कोरोनाच्या या संकटात झटणा-या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले. या संकटाशी लढणा-या प्रत्येकाचे मी आभार मानते. केवळ राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटी, पोलिस, डॉक्टर्स, नर्स, स्वच्छता कर्मचारी यांचेच नाही तर सामान्य जनतेचेही मी आभार मानते. कारण या काळात प्रत्येकजण एकमेकांसोबत उभे आहे. कुठलेही दान लहान किंवा मोठे नसते. आपण एकमेकांना साथ देत या आजाराला हरवू शकतो, असे ती म्हणाली.
२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले.
‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा चित्रपटातही ती झळकली.