Urvashi Rautela सिनेमा फ्लॉप होऊनही लग्झरी आयुष्य जगते उर्वशी रौतला, जाणून घ्या तिचा इन्कम सोर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 14:06 IST2023-07-08T14:03:58+5:302023-07-08T14:06:18+5:30
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही.

Urvashi Rautela सिनेमा फ्लॉप होऊनही लग्झरी आयुष्य जगते उर्वशी रौतला, जाणून घ्या तिचा इन्कम सोर्स
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. फिल्मी दुनियेपेक्षा सोशल मीडियावर ती जास्त सक्रिय असते. उर्वशी एकापेक्षा एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत चर्चेत येतेय.
‘सनम रे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या सौंदर्यानेही रसिकांवर मोहिनी घातली. आपल्या सौंदर्यासह हटके स्टाईलसाठी उर्वशी प्रसिद्ध आहे. नेहमीच्या महागड्या गोष्टींमुळेच उर्वशी रौतेलाला ‘फॅशन दिवा’ म्हणून संबोधले जाते.
उर्वशीला म्हणावं तसं यश बॉलिवूडमध्ये मिळालं नाही पण असं असताना ही अभिनेत्री लक्झरी लाइफ जगते. ती बऱ्याचदा सुपर हॉट आणि महागड्या फॅशनेबल लूकमध्ये दिसत असते. उर्वशीचा युनिक फॅशन सेन्स आणि तिच्या एकूणच व्यक्तिमत्त्वामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे लहानाची मोठी झालेल्या उर्वशीने वयाच्या १५ व्या वर्षीच मॉडलिंगची सुरुवात केली. २००९ मध्ये तिने 'मिस टीन इंडिया' चा खिताब जिंकला.
तसंच तिने 'मिस इंडिया प्रिंसेस', 'मिस टूरिज्म वर्ल्ड', 'मिस इंडिया सुपरमॉडल' हे खिताबही तिच्या नावावर केले आहेत. उर्वशीने 'सिंह साहेब द ग्रेट' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेता सनी देओलने तिच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अभिनेत्री चित्रपट आणि गाण्यांमधून मोठी कमाई करतात. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ती एका गाण्यासाठी 35 ते 40 लाख रुपये घेते. एका चित्रपटासाठी 3 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय उर्वशीची अर्धी कमाई ब्रँड एंडोर्समेंट आणि मॉडेलिंगमधूनही येते. तिला अनेक मोठ्या फॅशन डिझायनर्सची शोस्टॉपर बनण्याचा फायदा झाला आहे.