उर्वशी रौतेलाची आई भडकली; रिषभच्या प्रकृतीसाठी प्राथनेवरून झालेली ट्रोल, आता म्हणते
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 06:41 PM2023-01-05T18:41:54+5:302023-01-05T19:01:07+5:30
मीरा रौतेला यांना त्यांच्या पोस्टवरून खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण उर्वशीची आईही शांत बसणाऱ्यांपैकी नाही.
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि रिषभ पंतच्याबद्दल अनेक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. नेटिझन्स या ना त्या कारणाने दोघांनाही टार्गेट करत असतात. काही दिवसांपूर्वी रिषभ पंतच्या अपघात झाला आहे. याच दरम्यान, उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांना रिषभ पंतबद्दल इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. मीरा रौतेला यांना त्यांच्या पोस्टवरून खूप ट्रोल करण्यात आलं होतं. पण उर्वशीची आईही शांत बसणाऱ्यांपैकी नाही. मीरा रौतेलाने अलीकडेच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून नेटकऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
रिषभ पंत याला अधिक उपचारांसाठी देहराडून येथून मुंबई येथे आणण्यात आले आहे. पंतवर आता पुढील उपचार मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रिषभसाठी क्रिकेटपासून ते बॉलीवूड आणि राजकीय जगतातील सेलिब्रिटींनीही तो लवकरात लवकर तंदुरूस्त व्हावा, यासाठी सदिच्छा आणि प्रार्थना केल्या आहेत. याच दरम्यान उर्वशीच्या आईनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. मात्र असे केल्याने नेटकऱ्यांनी मीरा रौतेला यांना फटकारले होते.
युजर्सनी उर्वशीच्या आईला तिच्या पोस्टवर कमेंट करून खूप ट्रोल केले. मीरा रौतेला यांनी नुकतीच इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याच्या माध्यमातून त्यांनी ट्रोलवर निशाणा साधला आहे.
उर्वशी रौतेलाची आई मीरा रौतेला यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या राजा-महाराजांसारख्या खुर्चीवर बसलेल्या दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्या लिहितात की, 'आपल्याला स्वतःची किंमत कळली तर इतरांची निंदा तुम्हाला स्पर्श पण करु शकत नाही.' मीरा रौतेला यांनी कोणाचेही नाव न घेता सर्व ट्रोलवर निशाणा साधत उत्तर दिले आहे.