यो यो हनी सिंगच्या बहिणीच्या रिसेप्शनमध्ये परफॉर्म करणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, मानधनाची रंगलीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 17:08 IST2021-02-19T17:03:21+5:302021-02-19T17:08:06+5:30
विविध सिनेमात अनेक गाण्यांवर थिरकली आहे. उर्वशीवर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्यांनाही रसिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे वाट्टेल तितका पैसा मोजून उर्वशीला आपल्या सिनेमात नाचवण्यासाठी निर्माते दिग्दर्शक एका पायावर तयार असतात.

यो यो हनी सिंगच्या बहिणीच्या रिसेप्शनमध्ये परफॉर्म करणार 'ही' लोकप्रिय अभिनेत्री, मानधनाची रंगलीय चर्चा
बॉलिवूड क्वीन, उर्वशी रौतेला आणि, गायक गुरू रंधावा, पॉप-गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगची बहीण स्नेहा सिंग यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये परफॉर्म करताना दिसणार आहेत. पारंपरिक पंजाबी पद्धतीने हे लग्न होणार आहेय यांत हळद, मेंहदी आणि लग्न सोहळा अशा सा-या पारंपरिक गोष्टी असणार आहेत. इतंकच नाही तर या लग्न सोहळ्यात बड्या बड्या सेलिब्रिटींनी नाचावं अशी हनी सिंगची इच्छाही असावी .
प्रसिद्ध उर्वशी रौतेला आपल्या मादक अदांमुळे बॉलीवुडमध्ये यशाच्या शिखरावर पोहचली आहे. विविध सिनेमात अनेक गाण्यांवर थिरकली आहे. उर्वशीवर चित्रीत करण्यात आलेल्या गाण्यांनाही रसिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे वाट्टेल तितका पैसा मोजून उर्वशीला आपल्या सिनेमात नाचवण्यासाठी निर्माते दिग्दर्शक एका पायावर तयार असतात. कोट्यवधी रुपये मानधन थिरकणारी उर्वशी आता यो यो हनी सिंगच्या बहिणी लग्नात नाचणार आहे.
नुकतीच रिलीज झालेली “व्हर्जिन भानुप्रिया” अभिनेत्री उर्वशी रौतेला यापूर्वी “काबिल”, “सनम रे”, “भाग जॉनी” यासारख्या हिट चित्रपटांमध्ये दिसली होती. उर्वशी रौतेला यांनी “लव डोस”, “बिजली की तार”, आणि अगदी अलिकडील “तेरी लोड वे” सारख्या काही खळबळजनक संगीत व्हिडिओंमध्येही काम केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वशी रौतेला गेल्या महिन्यात लग्न झालेल्या स्नेहा सिंगच्या लग्नाच्या रिसेपशन मध्ये गुरु रंधावा सोबत परफॉर्म करणार आहे. निश्चितच उर्वशी रौतेला आणि गुरु रंधावा आपल्या दमदार परफॉर्मन्स ने सर्वांचे मन जिंकणार आहे मध्ये. गुरु रंधावाबरोबर उर्वशी रौतेला पुढील भूषण कुमारच्या टी-सीरिजद्वारे निर्मित "मर जायेंगे" म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहेत, रेमो डिसूझा या म्युझिक व्हिडिओचे डायरेक्ट केले आहेत.
कार्यक्षेत्रात, उर्वशी रौतेला सध्या तिच्या पुढील हिट वेब मालिका “इंस्पेक्टर अविनाश” च्या प्रशंसनीय अभिनेता रणदीप हूडासोबत शूट करत आहे. द्विभाषिक थ्रिलर “ब्लॅक गुलाब” आणि “तिरुत्तू पायले 2” चा हिंदी रिमेक सारख्या उर्वशी रौतेलाकडे अनेक चित्रपट आहेत. या सर्वांपेक्षा, सर्वात रोमांचक प्रकल्प इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमजान बरोबर एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट करत आहे.