तो मला अगदी राजकुमारीसारखा वागणूक द्यायचा...! उर्वशीला आठवला ‘एक्स- बॉयफ्रेन्ड’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 08:00 AM2020-11-06T08:00:00+5:302020-11-06T08:00:02+5:30
उर्वशी रौतेला बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. पण अद्याप सिंगल आहे.
उर्वशी रौतेला बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. पण अद्याप सिंगल आहे. खरे तर तिचे नाव अनेकांशी जोडले गेले. क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबतच्या तिच्या नात्याची तर जोरदार चर्चा झाली. अर्थात हार्दिकसोबतच्या अफेअरची गोष्ट उर्वशीने कायम नाकारली. पण हो, आपल्या एका ‘एक्स- बॉयफ्रेन्ड’बद्दल मात्र ती अगदी मनमोकळेपणाने बोलली. या एक्सचे नाव, गाव तिने काहीही सांगितले नाही. मात्र तो मला अगदी राजकुमारीसारखा वागवायचा, हे मात्र तिने दिमाखात सांगितले.
टाईम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी बोलली. तिने सांगितले, माझा एक्स-बॉयफ्रेन्ड मला अगदी प्रिन्सेससारखा ट्रिट करायचा. आता असे असताना नेमके कुठे बिनसले हे मात्र आम्हाला ठाऊक नाही.
रिलेशनशिपमध्ये मीच ‘रिच बॉयफ्रेन्ड’ असेन...
प्रेमावर माझा खूप विश्वास आहे. एक दिवस मला माझा स्वप्नातला राजकुमार नक्की भेटेन. तू वेल सेटल्ड आहेस,तेव्हा श्रीमंत मुलाशी लग्न कर, असे मला माझे अनेक मित्र म्हणतात. मी त्यांना यावर एकच उत्तर देते. ते म्हणजे, माझ्या रिलेशनशिपमध्ये मीच ‘रिच बॉयफ्रेन्ड’ असेन, असे उर्वशी म्हणाली.
‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला चित्रपटांत फार कमाल दाखवू शकली नाही. पण याऊपर चर्चेत कसे राहायचे हे उर्वशीला चांगलेच कळते. सोशल मीडियावर ती कमालीची अॅक्टिव्ह असते.
आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणा-या उर्वशीने 2011 मध्ये मिस टुरिस्ज्म क्वीन ऑफ द ईअरचा किताब जिंकला. याचवर्षी तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. भाग जानी, सनम रे अशा चित्रपटात ती दिसली. यानंतर ग्रेट ग्रँड मस्ती हा चित्रपट तिच्या झोळीत पडला. अलीकडे तिचा ‘वर्जिन भानुप्रिया’ हा सिनेमा रिलीज झाला होता.