"दिवसभर मेकअप लावून फिरण्यापेक्षा काही तरी शिकून घे", विराटचा फोटो पाहून युजर्सने या अभिनेत्रीला दिल्या खास टीप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 06:32 PM2021-03-17T18:32:26+5:302021-03-17T18:37:03+5:30
Urvashi Rautela's Mom Shares Pic of Virat Kohli : फॅशनची उत्तम जाण असलेली उर्वशी रौतेला सतत तिच्या महागड्या फॅशन स्टाइलमुळे जास्त चर्चेत असते. नुकताच तिने एक फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे.
एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेला ओळखली जाते. आपल्या अभिनयाची जादूने तिने रसिकांचीही मनं जिंकली आहेत. तिच्या ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन प्रत्येक लूकवर चाहते फिदा होतात. सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती फॅन्सशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. फॅशनची उत्तम जाण असलेली उर्वशी सतत तिच्या महागड्या फॅशन स्टाइलमुळे जास्त चर्चेत असते. नुकताच तिने एक फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे.
हा फोटो पाहून तिनेच चाहत्यांना तिला पडलेलेल्या कोड सोडवण्यास सांगितले आहे. शेअर केलेला फोटोही खास आहे. विराट कोहली त्याच्या आईला किचनमध्ये काम करण्यात मदत करत असल्याचा हा फोटो आहे. हा फोटो पाहून अनेकांनी उर्वशीली सांगितले की, दिवसभर मेकअप करत सोशल मीडियावर ऑन लाईन राहण्यापेक्षा जरा आईलाही कामात मदत कर. विशेष म्हणजे विराटचा फोटो उर्वशीला तिच्या आईनेच पाठवला आहे. तुझ्या आईलाही तू कामात मदत करावी असे थेट सांगितले नसले तरी हेच सांगण्याचा प्रयत्न या फोटोतून केला असल्याचे युजर्स तिला सांगत आहेत.
तिच्या वर्कफ्रंडबद्दल बोलायचे झाले तर, उर्वशी रौतेला लवकरच तामिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे ज्यामध्ये पहिला आलिया भट्टला मुख्य भूमिका साकारण्यात येईल असा अंदाज वर्तविला जात होता पण ही सगळी अफवाच होती आणि उर्वशी रौतेलाला मुख्य भूमिका साकारण्यासाठी निवडले गेले. यापूर्वी रजनीकांत, विक्रम, विजय, अजित कुमार या दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार्सबरोबर काम केलेले जोसेफ डी सामी आणि जेराल्ड आरोकीयम हे तमिळ साय-फाय चित्रपटात उर्वशी रौतेला सोबत काम करणार आहे.
उर्वशी रौतेला मायक्रोबायोलॉजिस्ट आणि आयआयटीयनची भूमिका साकारणार असून मनालीमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला त्यांनी सुरुवातही केली आहे. उर्वशी रौतेला पुढील साय-फाय चित्रपट पाहणार असून हा सुमारे २०० कोटींचा बिग बजेट चित्रपट आहे.