Urvashi Rautela : 'ये क्या हाल कर लिया रिषभ पंत के चक्कर में..', निळी लिपस्टिक लावल्यामुळे ट्रोल झाली उर्वशी रौतेला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 07:05 PM2023-05-19T19:05:12+5:302023-05-19T19:06:42+5:30
Urvashi Rautela Trolled: उर्वशी रौतेला निळ्या रंगाची लिपस्टिक घालून कान्सच्या रेड कार्पेटवर पोहोचली. त्यानंतर तिला ट्रोल केले जात आहे.
सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्स पैकी एक म्हणजे कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival 2023). यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. अनेक तारेतारका आपल्या ग्लॅमरस फॅशनसह रेड कार्पेटवर अवतरणार आहेत. जगभरातील शॉर्टलिस्ट केलेले अनेक चित्रपट याठिकाणी दाखवण्यात येतात. उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ने ही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केलं आहे.
उर्वशी मगरीचा नेकलेस घालून रेड कार्पेटवर पोहोचली. यावेळी ती निळ्या रंगाची लिपस्टिकमुळे चर्चेचा विषय बनली. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी उर्वशी निळ्या आणि क्रीम रंगाचा गाऊन परिधान करून आली होती. तिने या लुकला निळ्या रंगाच्या लिपस्टिक लावली होती. यानंतर तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.
उर्वशी रौतेलाने तिच्या कान्स लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून काही लोक त्याचे कौतुक करत आहेत तर काहीजण तिला लूक पाहून रिषभ पंतची आठवण झालीय.
उर्वशी रौतेला झाली ट्रोल
उर्वशीच्या पोस्टवर युजर्स खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले- 'डोरेमॉनची बहीण दिसत आहे.' तर दुसऱ्याने लिहिले- 'रिषभ पंतच्या नादात काय हाल केले आहेत?' आणखी एकाने लिहिले - 'दीदी कोणत्या लाईनमध्ये आली आहेस.
जेव्हा उर्वशी रौतेला कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली तेव्हा फ्रेंच मीडियाने तिला ऐश्वर्या समजले. उर्वशीला रेड कार्पेटवर पाहून ऐश्वर्या-ऐश्वर्याने ओरडायला सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्या हे नाव ऐकून उर्वशी चिडली नाही, उलट तिने वळून पापाराझींकडे स्माईल दिली.