बाबो ! एवढ्या लाख रुपयांचा ड्रेस घालून फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर अवतरली होती उर्वशी रौतेला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 05:12 PM2021-03-31T17:12:40+5:302021-03-31T17:19:12+5:30
उर्वशी रौतेला आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे.
ग्लॅमरस, उर्वशी रौतेला फिल्मफेअर रेड कार्पेटवर उतरली आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळतेय. उर्वशी तिच्या स्टाईल आणि हटके फॅशनसाठी ओळखली जाते.
अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. उर्वशी रौतेलाने फिल्मफेरेच्या रेड कार्पेटवर ३५ लाखांचा मरून ड्रेस घालून हजेरी लावली होती. यात ती फारच सुंदर दिसत होती. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
उर्वशी रौतेला आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल उर्वशीच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात.
उर्वशी रौतेला तिच्या आगामी 'इन्स्पेक्टर अविनाश' या वेब सीरिजचे शुटिंग करत आहे, यात आम्ही तिला रणदीप हूडा सोबत मुख्य भूमिका साकारताना पाहणार आहोत. उर्वशी रौतेला इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदान सोबत एका आंतराष्ट्रीय प्रकल्पात काम करणार आहे ज्याचे अजून हि खूप बझ आहे. द्विभाषिक थ्रिलर “ब्लॅक रोज” आणि “तिरुत्तू पायले 2” चा हिंदी रिमेक सारख्या उर्वशी रौतेलाकडे अनेक चित्रपट आहेत.